पुण्यातली सकाळ, वासुदेवाचं दर्शन आणि राज ठाकरे यांचं फोटोसेशन! ‘राज’महाल बाहेरचा मॉर्निंग किस्सा

| Updated on: Oct 20, 2022 | 11:37 AM

राज ठाकरे पुणे दौऱ्यावर! गुरुवारी सकाळी राज ठाकरे आणि वासुदेवाच्या भेटीदरम्यान पाहा काय घडलं?

पुण्यातली सकाळ, वासुदेवाचं दर्शन आणि राज ठाकरे यांचं फोटोसेशन! राजमहाल बाहेरचा मॉर्निंग किस्सा
राज ठाकरेंचा पुणे दौरा
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

अभिजीत पोटे, TV9 मराठी, पुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray in Pune) हे दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. आज सकाळी राज ठाकरे जेव्हा पुण्यातील मनसेच्या (MNS Pune) पक्ष कार्यालयात जाण्यासाठी निघाले, तेव्हा एक खास गोष्ट घडली. चक्क वासुदेव राज ठाकरे यांच्या भेटीला आला होता. राज ठाकरे पक्ष कार्यालयात जात असताना वासुदेवाने राज ठाकरेंसोबत फोटो (Raj Thackeray Photo) काढण्याची इच्छा व्यक्त केली. यावेळी राज ठाकरे यांनीही वासुदेवाचा हट्ट पुरवला. राज ठाकरे यांनी थांबून वासुदेवासोबत फोटो काढला आणि त्यांना हात जोडून नमस्कारही केला.

आज आणि उद्या राज ठाकरेही पुण्याच्या दौऱ्यावर आहेत. पुण्यातील राजमहाल या निवासस्थानी राज ठाकरे मुक्कामाला थांबले होते. त्यावेळी राज ठाकरे यांना भेटण्यासाठी पुण्यातील काही मनसैनिक आले होते. यावेळी वासुदेवही राज ठाकरे यांच्या भेटीला आल्याचं पाहायला मिळालं. विशेष म्हणजे स्वतः गाडी चालवत राज ठाकरे हे पक्ष कार्यालयाच्या दिशेने रवाना झाले.

पाहा व्हिडीओ :

हे सुद्धा वाचा

राज ठाकरे यांना पाहून वासुदेवालाही त्यांच्यासोबत फोटो काढण्याचा मोह आवरता आला नाही. यावेळी वासुदेवाच्या विनंतीला राज ठाकरे यांनीही ऐकली. मनसेच्याच एका कार्यकर्त्याने वासुदेवाचा राज ठाकरे ठाकरे यांच्यासोबत फोटो काढला. त्यानंतर राज ठाकरे आपल्या पुढच्या कार्यक्रमासाठी रवाना झाले.

पुण्यात वसंत मोरे यांच्या नेतृत्त्वात आज मनसेकडून शक्तिप्रदर्शन केलं जाण्याची शक्यता आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील अनेक जण आज पुण्यात मनसेत प्रवेश करणार आहे. अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते राज ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेत प्रवेश करणार आहेत.

खडकवासला, भोर, वेल्हा मुळशीतील पदाधिकारी मनसेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे पुण्यातील मनसेची ताकद वाढणार आहे. पालिका निवडणुकांच्या आधी मनसेतील वाढतं इनकमिंग महत्त्वपूर्ण मानलं जातंय.