मुंबई : आगामी महापालिका निवडणुकींबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोठी घोषणा केलीय. महापालिका निवडणुकांमध्ये मनसे 100 टक्के सर्व ताकदीनिशी उतरणार असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलंय. लोकसत्ता या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांनी ही घोषणा केली आहे. महापालिका निवडणुकींबाबत मनसेचा स्वत:चा एक कार्यक्रम असेल. इतकंच नाही तर मनसेची महापालिकेपर्यंतची वाटचाल ही एक पक्ष म्हणून असेल, असंही राज यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे. भाजप आणि शिवसेनेतील आरोप-प्रत्यारोपामुळे मुंबई महापालिका निवडणुकीबाबत चर्चेला उधाण आलं आहे. अशावेळी राज ठाकरेंची ही घोषणा म्हणजे मनसे कार्यकर्त्यांसाठी नवी ऊर्जा ठरण्याची शक्यता आहे. (Raj Thackeray’s big announcement about BMC and Other municipal corporation election)
लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना राज्यातील आगामी महापालिका निवडणुका आणि मनसेची वाटचाल याबाबत काही प्रश्न विचारले त्यावेळी राज यांनी मनसे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण होईल, अशी घोषणा केलीय. महापालिका निवडणुकीत मनसेची संभावित युती किंवा आघाडी होईल का? त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस तुमच्याकडे ममत्वाने पाहतं. भाजपलाही तुम्ही हवे आहात, तर तुमचं मत काय असंही राज यांना विचारण्यात आलं. त्यावर उत्तर देताना राज्य यांनी राज्यातील सध्यस्थितीवर बोट ठेवलं. सध्या कोण कुठल्या बिळातून बाहेर येईल हे माहिती नाही. पण त्यावेळी आपल्या स्वत:चा म्हणजे मनसेचा एक कार्यक्रम असणारच. मनसेची महापालिकेपर्यंतची वाटचाल ही पक्ष म्हणून असेल. हा मला पत्र पाठवतोय का? तो मला डोळा मारतोय का? यावर माझी वाटचाल अवलंबून नसेल. निवडणुका जेव्हा होतील तेव्हा बघू, असं उत्तर राज यांनी दिलं.
मुंबई महापालिका निवडणूक आणि अन्य महापालिकांच्या निवडणुकीत मनसे कुठे असणार, असा प्रश्न विचारला असता राज यांनी सध्याच्या कोरोना संकटाच्या स्थितीवर बोट ठेवलं. सध्या सांगणं खरंच कठीण आहे. मी उत्तर टाळत नाही. पण सध्याची परिस्थिती पाहता लॉकडाऊन कधी संपणार हे माहिती नाही. उद्या तिसरी लाट आली तर पुन्हा लॉकडाऊन. सध्या आपल्या हातात काहीच नाही. अशा परिस्थितीत दीर्घकालीन विषयांवर बोलणं उचित ठरणार नाही. पण एक मात्र नक्की की येणाऱ्या महापालिका निवडणुकीत मनसे पक्ष म्हणून 100 टक्के ताकदीने उतरणार, अशी घोषणाच राज यांनी केलीय.
मनसे आहे म्हणून राज ठाकरे आहे. माझं तोंड आणि माझ्या सहकार्यांचं काम आहे. पक्ष म्हणून नेता ओळखला जातो. एक राजकीय पक्षाचा नेता म्हणून बघितलं जातं. भारतात निवडणुका प्रतिकांवर होत असतात. लोकांनी मोदींना पाहून मतदान केलं. तर बाळासाहेबांना पाहून सत्ता दिली, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. देशात जो लाट निर्माण करतो तो जिंकतो. तसंच झालं. सध्या कोरोनाच्या लाटेवर सगळे स्वार आहेत, असा चिमटा त्यांनी काढला.
अजित पवारांनी पिंपरीत खूप मोठं काम केलं, पण नशिबी काय आलं, तर पराभव – राज ठाकरे https://t.co/kTc1mXOHjF @RajThackeray @mnsadhikrut @AjitPawarSpeaks @NCPspeaks @OfficeofUT #RajThackeray #MNS #AjitPawar #NashikMahapalika #elections
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 1, 2021
संबंधित बातम्या :
राज-उद्धव एकत्र येतील काय?; आकाशाकडे हात दाखवत राज म्हणाले…
अजित पवारांनी पिंपरीत खूप मोठं काम केलं, पण नशिबी काय आलं, तर पराभव – राज ठाकरे
Raj Thackeray’s big announcement about BMC and Other municipal corporation election