मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray lucky number 9 ) हे येत्या 9 तारखेपासून विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात करणार आहेत. ठाण्यात मनसेची पहिली (Raj Thackeray lucky number 9 ) सभा होईल. पहिल्या सभेसाठी मुहूर्त मनसेने आपला लकी नंबर 9 निवडला आहे. राज ठाकरे हे 9 हा अंक लकी मानतात. त्यामुळे मनसेचे महत्त्वाचे निर्णय, शुभारंभ हा 9 या नंबरभोवती फिरताना दिसतो.
राज ठाकरे किंवा मनसेचा 9 नंबरवर दृढ विश्वास आहे, याची अनेक उदाहरणे आहेत. शिवसेना सोडण्यापासून ते मनसेच्या घोषणेपर्यंत, गाडीच्या नंबरपासून ते विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यापर्यंत सर्वत्र 9 हाच नंबर दिसतो.
राज ठाकरेंचा लकी नंबर 9
राज ठाकरे यांच्या मनसेचं राजकारण 9 अंकाभोवतीच फिरते. कारण उमेदवार निवड, उमेदवारांची संख्या या सर्वांशी 9 या अंकाचा मेळ घालण्याचा प्रयत्न असल्याचं दिसून येतं.
मनसेने यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी जाहीर केली ती 27 उमेदवारांची. त्यामुळे 2+7 = 9 इथेही 9 चं गणित जुळून येतं. दुसरी उमेदवार यादी – 45 , 9 तारखेला ठाण्यातून प्रचाराला सुरुवात, असा सर्व 9 या अंकाशी मेळ घातल्याचं दिसून येतं.
गाड्यांचे नंबर, मुलाच्या लग्नाचा मुहूर्त
राज ठाकरे यांच्या सर्व गाड्यांचा नंबर 9 आहे. इतकंच काय त्यांचा मुलगा अमितच्या लग्नाचा मुहूर्तही 27 जानेवारी (2+7) दुपारी 12 वाजून 51 मिनिटांनी (1+2+5+1 = 9) होता.