ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray Thane) यांनी ठाणे दौरा करुन मनसेचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी राज ठाकरे यांनी पूरस्थितीवर (Maharashtra flood) भाष्य केलं. नियोजनशून्य कारभारामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत, असं राज ठाकरे म्हणाले.
पूरग्रस्तांना प्रत्येक जण आपआपल्या पद्धतीने मदत करत आहे. मनसेच्यावतीने देखील त्या त्या भागात मदतकार्य सुरू आहे. मदतकार्य महत्वाचे आहे. नुसती पाहणी करून काहीही अर्थ नाही, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.
नियोजन नाही, त्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत. महापूर हा काही पहिल्यांदाच आलाय असं नाही. नुसते रस्ते वाढत आहे, त्याला आकार नाही. नियोजन पहिले महत्वाचे आहे. ठाणे शहराची परिस्थिती वेगळी नाही. मी लहान असताना ठाणे शहर कसे होते आणि आता कसे आहे हे पाहतोय. टाऊन प्लॅनिंग नाही. त्यामुळे आशा परिस्थिती उद्भ्वत आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांना मी शुभेच्छा दिल्या आहेत, तुम्ही काळजी करू नका, असं म्हणत राज यांनी उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसावर भाष्य केलं.
संबंधित बातम्या
बॅग भरुन कपडे आणा, राज ठाकरेंचे मुंबईतील पदाधिकाऱ्यांना आदेश, ठाण्यावरुन आजच पुण्याला निघणार