मुंबई : मुंबईत बेकायदेशीररित्या राहणाऱ्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी घुसखोरांविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आझाद मैदानावर मोर्चा काढला. गिरगाव चौपाटीवरील हिंदू जिमखान्यापासून मोर्चाला सुरुवात झाली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे दुपारी तीन वाजता मोर्चात सहभागी झाले, त्यानंतर त्यांनी आझाद मैदानावरील सभेला (Raj Thackeray MNS Maha Morcha) संबोधित केलं. “ज्यांनी आज देशभरात मोर्चे काढले त्यांना मी सांगतो. मोर्चाला मोर्चाने उत्तर मिळालं आहे. यापुढे दगडाला दगडाने आणि तलवारीला तलवारीने उत्तर दिलं जाईल,” असा इशारा राज ठाकरेंनी पाकिस्तानी घुसखोरांना दिला. राज ठाकरेंच्या सहभागानंतर अवघ्या दोन तासांत मोर्चाची सांगता झाली. ठाणे, पालघर, पुणे, नाशिकसह राज्यभरातील मनसैनिक मोर्चाला उपस्थित राहण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते.
LIVE UPDATE
[svt-event title=”जास्त नाटक करालं तर दगडाला दगडाने, तलवारीला तलवारीने उत्तर : राज ठाकरे” date=”09/02/2020,5:08PM” class=”svt-cd-green” ]
जास्त नाटक करालं तर दगडाला दगडाने, तलवारीला तलवारीने उत्तर : राज ठाकरेhttps://t.co/9aAgOiRaxI #RajThackerayLive #मनसे_महामोर्चा #RajThackeray
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 9, 2020
[svt-event title=”राज ठाकरे आझाद मैदानात, थोड्याच वेळात तोफ धडाडणार” date=”09/02/2020,3:47PM” class=”svt-cd-green” ]
राज ठाकरे आझाद मैदानात पोहचले, डीसीपींच्या गाडीतून आझाद मैदानावर दाखल, थोड्याच वेळात सभेला संबोधित करणार https://t.co/zxha8rE1oG pic.twitter.com/9ixzJRA4zO
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 9, 2020
[svt-event title=”राज ठाकरेंच्या नेतृत्वात मनसेच्या महामोर्चाला सुरुवात” date=”09/02/2020,3:22PM” class=”svt-cd-green” ]
#LIVE : राज ठाकरेंच्या नेतृत्वात मनसेच्या महामोर्चाला सुरुवात, गिरगाव चौपाटीवरील हिंदू जिमखानापासून आझाद मैदानाच्या दिशेने मोर्चा सुरु pic.twitter.com/VQ52qdXmFp
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 9, 2020
[svt-event title=”राज ठाकरे गिरगावातील मोर्चास्थळी दाखल, थोड्याच वेळात मोर्चाला सुरुवात ” date=”09/02/2020,3:00PM” class=”svt-cd-green” ]
#LIVE : राज ठाकरे महामोर्चात सहभागी, गिरगावातील मोर्चास्थळी राज ठाकरे दाखल #RajThackeray pic.twitter.com/9YQbvoMeKT
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 9, 2020
[svt-event title=”राज ठाकरे मोर्चास्थळी दाखल” date=”09/02/2020,2:14PM” class=”svt-cd-green” ]
मनसेचा मोर्चा LIVE | राज ठाकरे हिंदू जिमखान्याजवळ दाखल https://t.co/zxha8rE1oG pic.twitter.com/4osM40OwW3
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 9, 2020
[svt-event title=”राज ठाकरे सिद्धिविनायकाच्या चरणी” date=”09/02/2020,1:53PM” class=”svt-cd-green” ]
राज ठाकरे सिद्धिविनायकाच्या चरणी, मनसेचा मोर्चा थोड्याच वेळात https://t.co/kGHfDJfyJs pic.twitter.com/b5QxtLhj4n
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 9, 2020
[svt-event title=”राज ठाकरे सिद्धिविनायकाच्या चरणी” date=”09/02/2020,1:42PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | राज ठाकरे सिद्धिविनायकाच्या चरणी, मंदिरातील एक्स्क्लुझिव्ह दृश्यं https://t.co/er76ysKpnL pic.twitter.com/c32YMlZLyw
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 9, 2020
[svt-event title=”राज ठाकरे सिद्धिविनायक मंदिराबाहेर” date=”09/02/2020,1:38PM” class=”svt-cd-green” ]
LIVETV | राज ठाकरे सिद्धिविनायकाच्या दर्शनाला https://t.co/kGHfDJfyJs pic.twitter.com/33kNrUtZXG
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 9, 2020
[svt-event title=”राज ठाकरे सिद्धिविनायकाच्या दर्शनाला रवाना” date=”09/02/2020,1:30PM” class=”svt-cd-green” ]
मनसे अध्यक्ष राज ठाकरे ‘कृष्णकुंज’हून रवाना, सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन मोर्चात होणार सहभागी, मोर्चापर्यंतचा प्रवास पाहा लाईव्ह https://t.co/D2qv4eGIHN pic.twitter.com/sJzZNpMXOS
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 9, 2020
[svt-event title=”सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन राज ठाकरे मोर्चाला जाणार” date=”09/02/2020,1:07PM” class=”svt-cd-green” ]
#BREAKING : मोर्चाला सुरुवात करण्यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिद्धिविनायकाचं दर्शन घेणार, काही वेळातच राज ठाकरे कृष्णकुंजवरुन निघणार pic.twitter.com/PM7dDuXsss
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 9, 2020
[svt-event title=”शिवरायांच्या पुतळ्याला मनसैनिकांचा दुग्धाभिषेक” date=”09/02/2020,12:51PM” class=”svt-cd-green” ]
#BREAKING : मनसेचा महामोर्चा : मोर्चाला सुरुवात करण्यापूर्वी चेंबुरमध्ये मनसैनिकांकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक, थोड्याच वेळात मनसेच्या मोर्चाला सुरुवात#MNSMahaMorcha pic.twitter.com/45fQGBRghj
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 9, 2020
[svt-event title=”मोर्चापूर्वी ‘कृष्णकुंज’वर राज ठाकरेंची तयारी” date=”09/02/2020,12:25PM” class=”svt-cd-green” ]
#महामोर्चा pic.twitter.com/Slhy4redR8
— Anil Shidore (@anilshidore) February 9, 2020
[svt-event title=”राज ठाकरे दुपारी दोन वाजता सहभागी होणार” date=”09/02/2020,12:03PM” class=”svt-cd-green” ] मनसे अध्यक्ष राज ठाकरे दुपारी दोन वाजता मोर्चात सहभागी होणार, राज ठाकरेंसह संपूर्ण कुटुंबाचा सहभाग [/svt-event]
[svt-event title=”दादरमध्ये मनसे नेत्यांकडून आरती” date=”09/02/2020,10:29AM” class=”svt-cd-green” ]
दादरमधील राम मंदिरात मनसेची आरती, मोर्चाला निघण्यापूर्वी देवदर्शन https://t.co/zxha8rE1oG @SandeepDadarMNS @MNSAmeyaKhopkar @mnsadhikrut #मनसे_महामोर्चा pic.twitter.com/4doZSrfzKd
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 9, 2020
[svt-event title=”ठाकरे कुटुंब मनसेच्या महामोर्चात” date=”09/02/2020,10:30AM” class=”svt-cd-green” ]
मनसेच्या मोर्चात राज ठाकरे सहकुटुंब सहपरिवार सहभागी होणार! https://t.co/jCixyiPGvt @mnsadhikrut @RajThackeray #मनसे_महामोर्चा
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 9, 2020
[svt-event title=”मनसेच्या मोर्चात भाजप आणि संघाचे कार्यकर्तेही” date=”09/02/2020,9:18AM” class=”svt-cd-green” ]
मनसेच्या मोर्चात भाजप आणि संघाचे कार्यकर्तेही सहभागी होणार : संदीप देशपांडे https://t.co/SFLzdT7gaA @mnsadhikrut @SandeepDadarMNS #मनसे_महामोर्चा
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 9, 2020
[svt-event title=”मनसे कार्यकर्त्यांसाठी भाजप आमदार महेश लांडगेंच्या बस” date=”09/02/2020,9:17AM” class=”svt-cd-green” ]
मनसेच्या मोर्चासाठी भाजप आमदाराच्या गाड्या https://t.co/z6AqeB0mBA
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 9, 2020
मोर्चात सहभागी होण्याचं आवाहन करणारे बॅनर मुंबईत ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत. अगदी ‘मातोश्री’समोरही मनसेने पोस्टरबाजी केली होती. सोशल मीडियातूनही मनसेने मोर्चासाठी चांगलीच ‘मोर्चेबांधणी’ केली आहे. मोर्चासाठी मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते जमा होतील, असा दावा मनसे पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे.
कसा असेल मनसेच्या मोर्चाचा मार्ग?
दुपारी 12 वाजता गिरगाव चौपाटीवरील हिंदू जिमखाना येथून मोर्चाला सुरुवात होईल. स्वतः राज ठाकरे मोर्चात सामील होतील. सर्व कार्यकर्ते, मोर्चात सहभागी होणाऱ्या संघटना आणि सर्वसामान्य नागरिक मागे असतील.
शामलदास गांधी मार्गावरुन हा मोर्चा पुढे जाईल. तिथून मेट्रो सिनेमा भागात मोर्चा पोहचल्यानंतर राज ठाकरे आणि काही नेते महापालिका मार्गावरुन आझाद मैदानात आत जातील. मनसे कार्यकर्ते आणि मोर्चात सहभागी झालेल्या व्यक्ती फॅशन स्ट्रीटच्या समोरील रस्त्यावरुन तीन गेटनी आझाद मैदानात आत जातील.
आझाद मैदानात उभारलेल्या भव्य स्टेजवर आधी मनसे नेत्यांची भाषणं होतील. अखेरीस मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण होईल. हा मोर्चा का काढण्यात आला आहे, याचा उद्देश काय, हे राज ठाकरे आपल्या भाषणातून जाहीर करतील. यानंतर मोर्चाची सांगता होईल.
महामोर्चात सामील होणाऱ्या नागरिकांना आणि महाराष्ट्र सैनिकांना काही महत्वाच्या सूचना. #मनसे_महामोर्चा pic.twitter.com/DUvpsOnZbo
— MNS Adhikrut (@mnsadhikrut) February 8, 2020
मोर्चाच्या आदल्या दिवशी (Raj Thackeray MNS Maha Morcha) औरंगाबादमधील शिवसेनेचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन यांनी मनसेत घरवापसी केली आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीत ‘कृष्णकुंज’वर त्यांनी मनसेचा झेंडा हाती घेतला.