Raj Thackeray : राज ठाकरेंना अखेर मुंबई पोलिसांची नोटीस, पहाटेपासून असणार तगडा पोलीस बंदोबस्त

| Updated on: May 03, 2022 | 11:25 PM

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना अखेर मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. कलम 149 अंतर्गत प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच शहरात पाहटेपासून तगडा पोलीस बंदोबस्त असणार आहे.

Raj Thackeray : राज ठाकरेंना अखेर मुंबई पोलिसांची नोटीस, पहाटेपासून असणार तगडा पोलीस बंदोबस्त
मनसे प्रमुख राज ठाकरेना पोलिसांची नोटीस
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना अखेर मुंबई पोलिसांनी नोटीस (Mumbai Police) बजावली आहे. कलम 149 अंतर्गत प्रतिबंधात्मक नोटीस बजावल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. तसेच शहरात पाहटेपासून तगडा पोलीस बंदोबस्त असणार आहे. मुंबईत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस आता अलर्ट मोडवर आले आहे. राज्यात सध्या मशीदीवरील लाऊडस्पीकर विरुद्ध हनुमान चालीसा असा संघर्ष सुरू आहे, अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज पुन्हा तसे लेखी आदेश मनसैनिकांना काढल्याने हा मुद्दा आणखी तापला आहे. गेल्या काही दिवसांपासून अजानवेळी हनुमान चालीसा लावल्याचे प्रकार अनेकदा समोर आले आहे. मशीदीवरील भोंगे उतरवा अन्यथा दुप्पट आवाजात उद्यापासून हनुमान चालीसा लावणार आहे. तसेच ऐकणार नसाल तर धर्माला धर्मानेच उत्तर देऊ असाही इशारा राज ठाकरे यांनी आज पुन्हा दिला आहे.

पहाटेपासून तगडा पोलीस बंदोबस्त

उद्या पाहटेपासून शहरात तगडा पोलीस बंदोबस्त असणार आहे. कारण पोलीस तैनात असले तरी मनसे गनिमी काव्याने अजानच्या वेळी हनुमान चालीसा लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ही सरकारवर आणि पोलिसांवर असणार आहे. त्यासाठी दुपासपासूनच पोलिसांनी मनसेच्या कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची दरपकड सुरू आहे. काही महत्वाच्या नेत्यांना आणि हजारो मनसे कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटीसाही बजावल्या आहे. मात्र तरीही आमच्यासाठी राज ठाकरेंचा आदेश हा महत्वाचा आहे.  अशी भूमिका काही मनसैनिकांनी घेतल्याने पोलिसांची डोकेदुखी आता चांगलीच वाढली आहे.

काही ठिकाणी हनुमान चालीसा लावली

राज ठाकरे यांच्या पत्रानंतर मुंबादेवी इथे कुंभार आळीमधील रामाची गल्ली दर्गा इथे मनसैनिक आणि स्थानिक मंडळानी मिळून लाऊड स्पीकर वर हनुमान चालिसा पठण केले आहे. या ठिकाणी शेकडोच्या संख्येने मनसैनिक आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. याची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून या ठिकाणच्या मनसैनिकांची आता धरपकड सुरू केली आहे.

हे सुद्धा वाचा

जळगावातही हनुमान चालीसा पठण

जळगावात शनि मंदिरावर हनुमान चालीसा चालवण्यात आल्याचे दिसून आले. मनसेकडून जिल्हापेठ भागात असलेल्या शनी मंदिरावर भोंगे लावण्यात आले होते. भोंग्याचा आवाज तपासणी करत हनुमान चालीसा लावण्यात आली. त्यानंतर जिल्हापेठ पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. मनसे कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनला आणून समज देत कार्यकर्त्यांची सुटका केली, असल्याचीही माहिती समोर आली आहे.