‘Raj Thackeray यांनी पुन्हा आपली भूमिका बदलू नये, मोरे आणि बाबर यांच्या पेक्षा हिंदुत्व महत्त्वाचं’- आनंद दवे

| Updated on: Apr 07, 2022 | 9:30 AM

"राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी परवा जाहीर सभेत बोलत असताना भोंग्याच्या विरोधात कारवाई करावी. त्याच्या विरोधात हनुमान चाळिसाचे पाठ होतील आणि ते मनसेच्या (MNS) सैनिकांनी करावं असं आवाहन केलं होतं. हिंदू महासंघाने त्यांचं लगेच स्वागत केलं होतं.

Raj Thackeray यांनी पुन्हा आपली भूमिका बदलू नये, मोरे आणि बाबर यांच्या पेक्षा हिंदुत्व महत्त्वाचं- आनंद दवे
मोरे आणि बाबर यांच्या पेक्षा हिंदुत्व महत्त्वाचं
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणे – “राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी परवा जाहीर सभेत बोलत असताना भोंग्याच्या विरोधात कारवाई करावी. त्याच्या विरोधात हनुमान चाळिसाचे पाठ होतील आणि ते मनसेच्या (MNS) सैनिकांनी करावं असं आवाहन केलं होतं. हिंदू महासंघाने त्यांचं लगेच स्वागत केलं होतं. पण त्याचवेळेस एक भीती सुध्दा व्यक्त केली होती, की कदाचित राज साहेब या वक्तव्यावरून डळमळीत होतील किंवा इनडायरेक्टली मागं घेतील. काल मनसेचे पुण्यातील नगरसेवक वसंत मोरे (Vasant More) आणि साईनाथ बाबर (Sainath Babar) यांनी त्या वक्तव्याला अनुसरून वागणार नाही, अशी जाहीर आणि स्पष्ट भूमिका घेतली. खरंतर राज ठाकरे यांची अशी बंडखोरी समजून घेण्याचा स्वभाव नाही आमच्या माहितीप्रमाणे, तरी ते उद्या मुंबईला बोलावून त्यांची समजूत घालणार आहेत. अप्रत्यक्षरित्या भोंग्याचं ते प्रकरण मागं घ्यावं, किंवा तुम्ही त्या भागात कराव की नाही. हे ऐच्छिक असावं अशी राज ठाकरे भूमिका घेतील असं स्पष्ट दिसतंय. हिंदू महासभा त्यांच्या सबबीवर नाराज आहे आणि दु:ख वाटतय आम्हाला त्याचं, आम्ही राज ठाकरेंना आपल्या माध्यमातून विनंती करू इच्छितो की, भोंग्याचं जे प्रकरण लावून धरल्याने भोंगा आता चालूच ठेवावा. बंद करू नका, हिंदुत्ववादी सुध्दा तुमच्याकडून अपेक्षेने पाहत आहेत” अशी भूमिका हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी मांडली.

नगरसेवक वसंत मोरे आणि साईनाथ बाबर आज राज ठाकरेंना भेटणार

राज ठाकरेंनी गुढीपाडवा मेळाव्यात मुस्लिम समाजाविरोधात घेतलेल्या भूमिकेशी सहमत नसल्याचं वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांनी स्पष्ट केलं आहे. तसेच आम्ही आमच्या प्रभागात असं वागणार नाही स्पष्ट सांगितलं आहे. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी राज ठाकरे आज त्यांनी मुंबईत भेट घेणार आहेत. राज ठाकरेंच्या भेटीनंतर वसंत मोरे आणि साईनाथ बाबर काय भूमिका हे आज स्पष्ट होईल.

गुढीपाडवा मेळाव्यात हिंदुत्वाचा मुद्दा जोरकसपणे मांडला

राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा गुढीपाडवा मेळाव्यात जोरकसपणे मांडला. राज ठाकरे यांनी राज्यातील लाऊडस्पीकरवर अजान वाजवण्याविरोधात महाराष्ट्र सरकारला दिलेल्या कडक ताकीद दिली होती. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या घाटकोपर कार्यालयात लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसा लावला. तसेच राज ठाकरे यांनी मुस्लिमांच्या झोपड्यांवरील मदरशांवर छापे टाकावेत. या झोपडयांमध्ये पाकिस्तानी समर्थक राहतात. मुंबई पोलिसांना माहित आहे की तिथे काय चालले आहे. आमचे आमदार त्यांचा वापर मतदानापुरता करतात, अशा लोकांकडेही आधार कार्ड किंवा कसल्याही प्रकारची ओळखपत्र नाही. पण आमदार ते बनवून घेतात असा मुद्दा जोरकसपणे राज ठाकरेंनी मांडला होता.

CCTV | उधारी परत करण्याचा तगादा, पुण्यात 34 वर्षीय तरुणाच्या हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद

Kiran Mane: ‘अख्खी सिरीयलच प्राईम टाईममधून लाथ घालून हाकलली’; ‘मुलगी झाली हो’ मालिकेविषयी किरण मानेंची पोस्ट चर्चेत

Video Nagpur Fire | नागपुरात आरा मशीनला भीषण आग, आग विझविण्यासाठी अग्निशमन विभागाच्या गाड्या रवाना