Raj Thackeray Thane Uttar Sabha : ‘तशी वेळ आली तर परत बोलेन’, राज ठाकरेंचा नरेंद्र मोदींच्या ‘लाव रे व्हिडीओ’ वर पुन्हा भाजपला इशारा

| Updated on: Apr 12, 2022 | 8:16 PM

विरोधकांच्या टीकेला आज राज ठाकरे यांनी ठाण्यातून जोरदार प्रत्युत्तर दिलंय. इतकंच नाही तर राज ठाकरे यांनी आपल्यावर टीका करणाऱ्या महाविकास आघाडीतील नेत्यांवरही जोरदार हल्ला चढवला.

Raj Thackeray Thane Uttar Sabha : तशी वेळ आली तर परत बोलेन, राज ठाकरेंचा नरेंद्र मोदींच्या लाव रे व्हिडीओ वर पुन्हा भाजपला इशारा
राज ठाकरे, अध्यक्ष, मनसे
Image Credit source: TV9
Follow us on

ठाणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज ठाण्यात उत्तरसभा घेत महाविकास आघाडी सरकारमधील (Mahavikas Aghadi) घटकपक्षांवर आणि आपल्या टीकाकारांवर जोरदार हल्ला चढवला. गुढीपाडव्याला झालेल्या शिवतीर्थावरील सभेत राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) टीका न करता त्यांचं कौतुक केलं होतं. तर महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. त्यानंतर राज ठाकरे यांचं भाषण म्हणजे भाजपची स्क्रिप्ट होती, तसंच मनसे आता भाजपची बी टीम झालीय, अशी टीका महाविकास आघाडीतील नेत्यांनी केली होती. विरोधकांच्या टीकेला आज राज ठाकरे यांनी ठाण्यातून जोरदार प्रत्युत्तर दिलंय. इतकंच नाही तर राज ठाकरे यांनी आपल्यावर टीका करणाऱ्या महाविकास आघाडीतील नेत्यांवरही जोरदार हल्ला चढवला.

महाविकास आघाडीवर टीका, भाजपलाही इशारा

राज ठाकरे यांनी आपल्यावर टीका करणाऱ्या महाविकास आघाडीतील नेत्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. त्यावेळी राज ठाकरे यांनी आशुतोष गोवारीकर यांच्या चित्रपटाचा दाखला दिला. गुढीपाडव्याला पत्रकार स्वत:चं एक काहीतरी घेऊन आले होते. मी कोणत्या विषयावर बोलणार हे तेच ठरवून आले होते. तीन वर्षापूर्वी गुढीपाडव्याच्या सभेत पंतप्रधान मोदींवर बोललो होते, मग यावेळेलाही बोलतील. आता नाही बोललो. पुन्हा तशी वेळ आली तर बोलेन. इतरही विषय आहेत, तुमचेही वाभाडे काढायचे आहेत मला, अशा शब्दात राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना उत्तर दिलं. इतकंच नाही तर भाजपलाही एकप्रकारे इशारा दिलाय.

‘गेल्या निवडणुकीच्या वेळेला बहुमत शिवसेना भाजपकडे आलं, त्यानंतर तुम्ही मतदारांची प्रतारणा केली आणि महाविकास आघाडीचं सरकार बनलं, त्याआधी पहाटेचा शपथविधी झाला, तो फिस्कटला आणि मग यांचं सरकार बसलं. या दोन्ही गोष्टींवर बोलल्यानंतर भाजपची स्क्रीप्ट कुठून आली. जनता विसरली होती मी फक्त आठवण करुन दिली, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले.

इंटेलिजन्सवरुन राज्य सरकारला जोरदार टोला

राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच महाविकास आघाडी सरकार आणि गृहखात्याला जोरदार टोला हाणला. ठाण्यातील सभेला किती वाजता जाणार असं मला पोलिसांनी विचारलं. का तर म्हणे काही संघटना तुमचा ताफा अडवणार आहेत. म्हणजे माझ्या ताफ्याला कोणतरी अडवणार हे इंटेलिजन्सला कळलं. पण पवार साहेबांच्या घरी एसटीचे लोकं जाणार हे त्यांना नाही कळलं. खरं तर त्यांना प्रत्येक गोष्ट माहिती असते. एखादा माणूस शिंकला तर तो कोरोनाचा की साधा शिंकला हे ही त्यांना माहिती असतं, असा टोला राज ठाकरे यांनी लगावलाय.

उत्तर सभा नेमकी का?

ही सभा घेण्याचं खरं तर काहीच कारण नाही. गुढीपाडव्याच्या सभेनंतर अनेकांनी जे तारे तोडले. ते तोडल्यानंतर मला असं वाटलं की याचं उत्तर तर दिलं पाहिजे. पण मला पत्रकार परिषद घेऊन उत्तर द्यायचं नव्हतं. याचं एकमेव कारण की पत्रकार परिषद जर घेतली असती तर या सगळ्या पक्षांना बांधिल पत्रकार विषय भलतीकडे भरकटवतात. म्हणून मग मी सभा घ्याययं ठरवलं. आताही ही सभा महाराष्ट्रात काही ठिकाणी वीज नाही म्हणून थांबवली गेलीय. हल्ली सगळं मोबाईलवर दिसतं. तुमच्या करंटची अपेक्षा कुणाला आहे? ही आपली जाहीर सभा मोठे स्क्रीन लावून जम्मूतही दाखवली जातेय. अनेक राज्यात ही सभा दाखवली जातेय. म्हणून ही जाहीर सभा सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी घेतली.

इतर बातम्या : 

Raj Thackeray Sabha : ‘वसंत सेना ते शरद सेना असा प्रवास करणाऱ्यांनी आमच्याबद्दल बोलू नये ‘, संदीप देशपांडेंचा आदित्य ठाकरेंना जोरदार टोला

Raj Thackeray Thane News: साहेबांना एक पायरी चढता येत नव्हती, वसंत मोरेंनी भरसभेत राज ठाकरेंच्या तब्येतीचाही वृत्तांत दिला, नेमकं काय झालंय?