Raj Thackeray vs NCP : मनसेच्या हनुमान चालीसा पठणाला राष्ट्रवादीचं महाआरतीने उत्तर! जयंत पाटील, सुप्रिया सुळेही उपस्थित राहणार, पुणे तापणार?

| Updated on: Apr 15, 2022 | 6:09 PM

पुण्यात मनसेकडून हनुमान जयंतीला सामुहिक हनुमान चालीसा पठणाचं आयोजन करण्यात आलंय. तर मनसेला प्रत्युत्तर म्हणून आता राष्ट्रवादीकडून हनुमान मंदिरात महाआरती करण्यात येणार आहे. या आरतीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित राहणार आहेत.

Raj Thackeray vs NCP : मनसेच्या हनुमान चालीसा पठणाला राष्ट्रवादीचं महाआरतीने उत्तर! जयंत पाटील, सुप्रिया सुळेही उपस्थित राहणार, पुणे तापणार?
पुण्यात हनुमान मंदिरात राष्ट्रवादी काँग्रेसकडून आरतीचं आयोजन
Image Credit source: TV9
Follow us on

पुणे : राज्यात सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस असं जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी शरद पवार यांच्यावर जातीवादाचा आरोप केलाय. इतकंच नाही तर मशिदीवरील भोंग्यांना (Loudspeaker on Mosque) तीव्र विरोध करत राज्य सरकारला हे भोंगे हटवण्यासाठी 3 मे पर्यंतचा अल्टिमेटमही दिलाय. तसंच मशिदींवरील भोंग्यांसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालीसा लावण्याचे आदेशच राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिलेत. राज ठाकरे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर आता पुण्यात मनसेकडून हनुमान जयंतीला सामुहिक हनुमान चालीसा पठणाचं आयोजन करण्यात आलंय. तर मनसेला प्रत्युत्तर म्हणून आता राष्ट्रवादीकडून हनुमान मंदिरात महाआरती करण्यात येणार आहे. या आरतीला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) आणि खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित राहणार आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुण्यातील दूधाणे लॉन्सजवळील मारुती मंदिरात आरतीचं आयोजन करण्यात आलंय. या आरतीला जयंत पाटील, सुप्रिया सुळे यांच्यासह महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. महत्वाची बाब म्हणजे ही आरती मुस्लिम बांधवाच्या हस्ते करण्यात येणार आहे. या आरतीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जय्यत तयारी सुरु असल्याचं पहायला मिळतंय. मनसेचं सामुहिक हनुमान चालीसा पठण आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाआरती यामुळे पुण्यातील राजकीय वातावरण आता अधिक तापण्याची शक्यता निर्माण झालीय.

राष्ट्रवादीकडून हनुमान मंदिरात करणार इफ्तार पार्टी!

इतकंच नाही तर राष्ट्रवादीकडून उद्या इफ्तार पार्टीचे आयोजनही करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हनुमान मंदिरात इफ्तार पार्टीचे आयोजित करण्यात आलीय. साखळीपीर हनुमान मंदिरात ही इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली आहे. हनुमान जयंतीच्या प्रसादाने मुस्लीम नागरिक आपला रोजा सोडणार आहेत. राष्ट्रवादीच्या शिवानी माळवदकर यांच्याकडून या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.

मनसेकडून सामुहिक हनुमान चालीसा पठण

राज्यातील राजकारण तापलेलं असताना आणि राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसकडून मनसेवर जोरदार हल्ला चढवला जात असताना राज ठाकरे यांचा पुणे दौरा घोषित करण्यात आलाय. राज ठाकरे 16 एप्रिलला पुणे दौऱ्यावर जाणार आहेत. राज यांच्या दौऱ्यावेळी सामुहिक हनुमान चालीसा पठण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमाला राज ठाकरे उपस्थित राहणार आहेत. खालकर चौक मारुती मंदिराजवळ हा कार्यक्रम होणार असून, मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांच्याकडून या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

इतर बातम्या :

NCP Rupali Patil : ‘राज ठाकरेंनी विकासाच्या मुद्द्यांवर बोलावे, कायदा हातात घेणाऱ्यांवर होणार कारवाई’; रुपाली पाटील यांचे मनसेला टोले

Pune MNS clashes : पुण्यात मनसेतील मतभेद चव्हाट्यावर! ‘हनुमान चालिसा’चा कार्यक्रम अजय शिंदेंचा, वसंत मोरेंचा आरोप

MNS Raj Thackeray : राज ठाकरे आजपासून पुणे दौऱ्यावर, हनुमान मंदिरात महाआरती करणार