औरंगाबाद : राज ठाकरे (Raj Thackeray) अटक करून घेणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. तसेच पोलिसांनी (Aurangabad Police) जाबाब नोंदवण्यासाठी ते औरंगाबादला जाणार असल्याची माहितीही सुत्रांनी दिली आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेमुळे आता या प्रकरणात आणि राज्याच्या राजकारणात नवं ट्विस्ट आलं आहे.
पोलिसांनी नोटीस बजावल्यास (Police Notice) राज ठाकरे औरंगाबादेतल्या सीटी चौक पोलीस ठाण्यात दाखल होत जबाबही नोंदवणार आहेत. तसेच पोलिसांनी अटकेची गरज आहे, असे सांगितल्यास ते अटक करुन घेण्यासही तयार असल्याचेही सुत्रांनी सांगितले आहे. राज ठाकरेंना अटक झाल्यास पुन्हा मोठा एकाद मोठं राजकीय वादळ तयार होऊ शकतं. मनसैनिक पुन्हा आक्रमक होऊ शकतात. राज ठाकरेंच्या या नव्या भूमिकेने पुन्हा अनेकांना संभ्रमात पाडले आहे.
राज ठाकरे यांनी सरकारला ईदचा अल्टिमेटम दिल्यामुळे पुन्हा पोलीसही आक्रमक झाले आहेत. पोलिसांनी राज्यभरात मनसेच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना नोटीसा बजावत त्यांच धरपकड सुरू केली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील 30 ते 40 पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी नोटीस दिल्याची माहिती समोर आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील मनसे नेत्याना पोलिसांनी नोटिसा बजवल्या. राज्य उपाध्यक्ष राजू उंबरकर, जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार ,यांना नोटिसा आल्याची माहिती समोर् आली आहे. तसेच जिल्ह्यात जमावबंदीचे आदेश लागू असल्याचे सांगत कोणत्याही मस्जिदच्या 100 मीटर अंतराच्या आत महाआरती आयोजित करू नये, असेही सांगण्यात आले आहे.
औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी यावरून सरकारला काही खोचक सवाल केले आहे. तसेच कडाडून टीकाही केली आहे. समाजात तेढ निर्माण करण्याचा राज ठाकरेंचा प्रयत्न आहे. मी कुणाचेही समर्थन करणार नाही. मात्र नवनीत राणा यांनी हनुमान चालीसा वाचण्यासाठी आल्या तर त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करता मग राज ठाकरेंनी काय वेगळा गुन्हा केला आहे की त्यांना जामीनपात्र गुन्हे लावले, असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच पोलिसांनी आपली जबाबदारी चांगल्या रितीने पार पाडावी, मुस्लिमांना पोलिसांवर विश्वास ठेवण्याचे आवाहनह त्यांनी केलं आहे. तर राज ठाकरेंना सोपी कलमं लावल्याचा जलील यांचा आरोप आहे. त्यामुळे सध्या राज्यात यावरून जोरादर राजकीय घमासान सुरू आहे. आता या प्रकरणा पोलीस पुढे काय भूमिका घेतात यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत.