मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आज गुढीपाडवा मेळाव्यात महाविकास आघाडी (MahaVikas Aghadi) आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. 2019 ची विधानसभा निवडणूक आणि त्यानंतर झालेलं सत्तास्थापनेचं नाट्य, यावरुन राज ठाकरे यांनी शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर निशाणा साधला. ‘विधानसभेची निवडणूक आठवा. भाजप आणि शिवसेना विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. निकाल लागल्यानंतर खास करुन शिवसेनेला साक्षात्कार झाला. की अडीच अडीच वर्षे ठरली होती. आमच्याशी तर कधी बोलला नाहीत. महाराष्ट्राच्या सभात किंवा आमच्याशी तर कधी बोलला नाहीत. पंतप्रधान मोदींसोबत तुम्ही व्यासपीठावर बसला होतात. तेव्हा पंतप्रधान म्हणाले होते की मुख्यमंत्री भाजपचा होईल, अमित शाह बोलले होते तेव्हाही तुम्ही काही बोलला नाहीत’, अशा शब्दात राज ठाकरे यांनी थेट उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलं.
राज ठाकरे यांनी आपल्या भाषणाची सुरुवात माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनिंनो आणि मातांनो अशा शब्दात केली. त्यानंतर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, तिन वर्षापूर्वी इथे गुढीपाडवा मेळावा झाला होता. त्यानंतर दोन वर्ष हा मेळावा काही घेता आला नाही. तो कोरोना, त्यात आलेला लॉकडाऊन. लॉकडाऊनचा काळ आठवला तरी काही वेळा बरं वाटतं पण काही वेळा त्रास होतो. हे आज गडबजलेलं शिवतीर्थ सामसूम होतं. अख्ख्या जगात सामसूम होती. एक माणूसही फिरताना दिसायचा नाही. एक तर कोरोनाची भीती होती, नाहीतर आमच्या पोलिसांचा दांडिया होता. ते तरी बिचारे काय करणार. या सगळ्या काळात पोलिसांनी जे काम केलं त्यांचे मी आभार मानतो. आपल्याला कोरोना होईल का, आपण राहू की जाऊ याचा विचार न करता चोविस चोविस तास ते रस्त्यावर होते. आज दोन वर्षानंतर बोलताना मोरी इतकी तुंबलीय की साला डोळा घालावा कुठून तेच कळत नाही. जितकं शक्य होईल तितकं आज साफ करु’, अशा शब्दात राज ठाकरे यांनी
राज ठाकरे पुढे म्हणाले की, तो लॉकडाऊन ते घरात बसणं सगळ्यांच्या विस्मरणात गेलं हे बरं झालं. लॉकडाऊनसोबत अनेक गोष्टी विस्मरणात गेल्या. म्हणून मला वाटलं आज जरा फ्लॅशबॅक देऊ. दोन वर्ष आपण सगळे शांत होतो. पण त्या दोन वर्षापूर्वी झालेल्या घटना आपण विसरुन गेलो. 2019 साली झालेली विधानसभेची निवडणूक.. रोज नवीन बातम्या. त्यामुळे आधीचं सगळं विसरायला होतं. आणि तुम्ही ते विसरता हे कसं काय चालेल. विधानसभेची निवडणूक आठवा. भाजप आणि शिवसेना विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस. निकाल लागल्यानंतर खास करुन शिवसेनेला साक्षात्कार झाला. की अडीच अडीच वर्षे ठरली होती. आमच्याशी तर कधी बोलला नाहीत. महाराष्ट्राच्या सभात किंवा आमच्याशी तर कधी बोलला नाहीत. पंतप्रधान मोदींसोबत तुम्ही व्यासपीठावर बसला होतात. तेव्हा पंतप्रधान म्हणाले होते की मुख्यमंत्री भाजपचा होईल, अमित शाह बोलले होते तेव्हाही तुम्ही काही बोलला नाहीत. आणि जसा निकाल लागला आणि लक्षात आलं की आपल्यामुळे सरकार अडतंय. तेव्हा लक्षात आलं आणि टूम काढली. म्हणे अमित शाहांशी मी एकांतात बोललो होतो. बाहेर का बोलला नाहीत. मुख्यमंत्रीपदाबाबतची गोष्टी तुम्ही चार भिंतीत का केलीय. शाह सांगतात की आम्ही असं काही बोललो नाही, असा हल्लाबोल राज ठाकरेंनी केलाय.
एक दिवस आम्ही पहाटे उठून पाहतो तर जोडा वेगळाच. साले पळून कुणासोबत गेले आणि लग्न कुणासोबत काही कळेच ना. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणू शपथ घेतो… असं म्हणत राज ठाकरे यांनी अजित पवारांची नक्कल केली. ते पुढे म्हणाले की, मग एक आवाज आला ये शादी नही हो सकती. फिसकटली… मग सगळे घरी. हे सगळं सुरु असताना एकजण गॅलरीतून डोळा मारतोय. मला घ्या ना सोबत. तीन नंबरचा पक्ष एक आणि दोन नंबरला फिरवतोय. मी महाराष्ट्राच्या राजकारणात असं कधी पाहिलं नाही. व्यासपीठावरुन तुम्ही एकमेकांना शिव्या घालता आणि नंतर मांडीवर जाऊन बसता. कारणं सांगतात की अडीच वर्षे ठरलं होतं. ज्या मतदारांनी तुम्हीला मतदान केलं त्यांनी तुम्हाला शरद पवार आणि काँग्रेससोबत जाण्यासाठी नव्हतं केलं. मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांना तुम्ही काय शिक्षा देणार? पण आम्ही सगळं विसरुन गेलो, अशी खंत व्यक्त करत राज ठाकरे यांनी जनतेलाच महत्वाचा सवाल केलाय.
इतर बातम्या :