Rajasthan Election Exit Poll Result : धर्माचे कार्ड खेळले… एक्झिट पोलच्या अंदाजानंतर मुख्यमंत्री यांचे मोठे विधान

| Updated on: Nov 30, 2023 | 8:38 PM

राजस्थानची सत्ता कॉंग्रेसच्या हातातून निसटण्याची चिन्हे आहेत. गेली अनेक वर्ष सत्ता आलटून पालटून देण्याची इथल्या जनतेची प्रथा यंदाही कायम रहाण्याची चिन्हे आहेत.

Rajasthan Election Exit Poll Result : धर्माचे कार्ड खेळले... एक्झिट पोलच्या अंदाजानंतर मुख्यमंत्री यांचे मोठे विधान
Rajasthan Election Exit Poll Result 2023
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

Rajasthan Election Exit Poll Result 2023 | 30 नोव्हेंबर 2023 : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या एक्झिट पोलचा अंदाज गुरुवारी जाहीर झाला. या अंदाजानुसार राजस्थानची सत्ता कॉंग्रेसच्या हातातून निसटण्याची चिन्हे आहेत. गेली अनेक वर्ष सत्ता आलटून पालटून देण्याची इथल्या जनतेची प्रथा यंदाही कायम रहाण्याची चिन्हे आहेत. भाजपला 100 ते 110 जागा मिळतील असा अंदाज बव्हंशी एक्झिट पोलने दिला आहे. मात्र, यावर मावळते मुख्यमंत्री अशोक गेलहोत यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. भाजपने जर धर्माचे कार्ड खेळले तरच आम्ही हरणार असे ते म्हणाले आहेत.

भाजपने मध्यप्रदेश आणि कर्नाटकमध्ये कॉंग्रेसचे सरकार पाडले. परंतु, राजस्थान सरकार पाडण्यात त्यांना अपयश आले. त्यामुळे यावेळी दिल्लीत सर्वांनी विचारपूर्वक राजस्थानमध्ये पुन्हा काँग्रेस सरकार आणायचे नाही असे नियोजन केले असेल. पण, हा त्यांचा समज आहे. भाजपने या निवडणुकीत धर्माचे कार्ड खेळले. तर, आम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढविली. त्याचे कार्ड जर चालले नाही तर आमचेच सरकार स्थापन होईल, निवडणूक पूर्व सर्वेक्षण काहीही म्हणते असे अशोक गेलहोत यांनी सांगितले.

राजस्थानमध्ये आम्ही सरकार बनवत आहोत. सट्टेबाजांनी आणि मिडीया काहीही म्हणत आहे. गेल्या ६ महिन्यांत आम्ही गावोगावी जे काही ऐकले त्यावरून असे वाटते की आम्हीच सरकार स्थापन करू, असे माझे मत आहे असे त्यांनी सांगितले. देशातील हे असे पहिले सरकार आहे ज्याविरोधात कोणतीही अँटी इन्कम्बन्सी नाही. मुख्यमंत्री यांनी आपल्या कामात कोणतीही कसर ठेवली नाही, असे भाजपचे मतदारही म्हणतील, असा टोलाही त्यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा

कॉंग्रसचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनीही काँग्रेस सरकार स्थापन करेल अशी आशा व्यक्त केली आहे. जनता खूप हुशार आहे, ते सगळे ऐकतात आणि योग्य तो निर्णय घेतात. शेवटी जनतेचा निर्णय सर्वांना मान्य असतो असेही ते म्हणाले.