जयपूर : चांगले इंग्रजी बोलणे आणि हँडसम दिसणे पुरेसे नाही, आपली विचारधारा आणि वचनबद्धता पाहिली जाते, असा टोला राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी निलंबित उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांना अप्रत्यक्षपणे लगावला. राजस्थानातील राजकारण रंगात आले असताना मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. (Rajasthan CM Ashok Gehlot taunts Sachin Pilot)
“जयपूरमध्ये घोडेबाजार होत होता, याचा पुरावा आमच्याकडे आहे. आम्हाला आमदारांना 10 दिवसांसाठी हॉटेलमध्ये ठेवावे लागले, जर आपण ते केले नसते तर मानेसरमध्ये (हरियाणा) जी गोष्ट घडली, तीच परत घडली असती” असा दावा गहलोत यांनी केला.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
“मी 40 वर्षांपासून राजकारणात आहे, आम्हालाही नवीन पिढी आवडते, भविष्य त्यांचेच आहे. हे नवीन पिढीचे नेते, ते केंद्रीय मंत्री झाले, प्रदेशाध्यक्ष झाले आहेत, आमच्या काळात आम्ही काय-काय केले हे ठाऊक असते, तर त्यांना नीट समजले असते.” अशी चपराकही त्यांनी लगावली.
हेही वाचा : मी भाजपमध्ये जाणार नाही, सचिन पायलट यांची मोठी घोषणा
“सफाईदार इंग्रजी बोलणे, माध्यमांना चांगले बाइट देणे आणि देखणे असणे हे सर्व काही नाही. देशाबद्दल आपल्या मनात काय आहे, आपली विचारधारा, धोरणे आणि वचनबद्धता, हे सर्व काही विचारात घेतले जाते” असे गहलोत यांनी सुनावले.
Speaking good English, giving good bytes and being handsome isn’t everything. What is inside your heart for the country, your ideology, policies, and commitment, everything is considered: Ashok Gehlot, Rajasthan Chief Minister pic.twitter.com/xHS5WzajWb
— ANI (@ANI) July 15, 2020
दरम्यान, मी भाजपमध्ये जाणार नाही, अशी मोठी घोषणा राजस्थानचे युवा नेते सचिन पायलट यांनी केली. काँग्रेसने राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपद आणि प्रदेशाध्यक्षपदावरुन हकालपट्टी केल्यानंतर सचिन पायलट पहिल्यांदाच माध्यमांसमोर आपली सविस्तर प्रतिक्रिया देणार आहेत. ते तिसरी आघाडी अर्थात नवीन पक्ष स्थापन करण्याच्या शक्यता बळावल्या आहेत. (Rajasthan CM Ashok Gehlot taunts Sachin Pilot)