राजस्थानमध्ये मुख्यमंत्री पदावरून सध्या रणकंदन (Rajasthan politics) माजलंय. काँग्रेस अध्यक्षपदी अशोक गहलोत (Ashok Gahlot) यांची निवड होण्याची चिन्ह आहेत. मात्र राजस्थान विधीमंडळात गहलोत गटाचंच वर्चस्व टिकून राहण्यासाठी त्यांची प्रचंड धडपड सुरु आहे. या सगळ्या गोंधळात सचिन पायलट (Sachin Pilot) यांनी मौन राहूनच मास्टर स्ट्रोक मारलाय. ते म्हणाले, मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी मला नेहमीच निकम्मा म्हटलं. किंवा आणखी काही दुषणं दिली. पण मी त्यांना पित्यासमानच मानलंय. गहलोत हे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले तर त्यांना माझ्या शुभेच्छाच आहेत. तर दुसरीकडे पक्षातील वरिष्ठ नेतृत्वाची भेट घेऊन त्यांना विश्वासतही घेतलं आहे.
मी मुख्यमंत्री झालो तर सर्वच आमदारांची जुळवाजुळव करण्याची जबाबदारी माझी असेल. हे मी करूनही दाखवेन, अशी खात्री सचिन पायलट यांनी दिली आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत केंद्रीय राजकारणात म्हणजेच काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष बनणार अशी चिन्ह आहेत. त्यामुळे राजस्थान काँग्रेसमध्ये प्रचंड गोंधळ माजलाय.
Rajasthan political crisis: Congress committee urges Sonia Gandhi to pull Ashok Gehlot out of party president race
Read @ANI Story | https://t.co/TQKAgqbylb#RajasthanPoliticalCrisis #SoniaGandhi #AshokGehlot #Congress pic.twitter.com/49gSChpJ6Q
— ANI Digital (@ani_digital) September 26, 2022
सचिन पायलट सध्या मौन दिसत असले तरीही त्यांनीही गहलोत यांच्या माघारी मुख्यमंत्री पद हाती घेण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. पण सचिन पायलट यांनी मुख्यमंत्री बनलेलं अशोक गहलोत यांना सहन होणारं नाही. याआधीही अशोक गहलोत यांनी याच गोष्टीसाठी पक्षनेतृत्वालाही इशारा दिला आहे.
दोन दिवसांपूर्वीच राजस्थानात आलेल्या काँग्रेस पर्यवेक्षकांनी आमदारांनी बैठक बोलावली होती. त्यावेळी गहलोत यांच्या इशाऱ्यानुसारच, सर्व आमदार विधानसभा अध्यक्ष सीपी जोशी यांच्या घरी जमा झाले होते. त्यांच्याकडे राजीनामाही सोपवण्यात आला होता. त्यामुळे पक्षाचे वरिष्ठ नेतेही नाराज झाले होते.
राजस्थानमध्ये रणकंदन सुरु असतानाच प्रियंका गांधी यांनी सोनिया गांधी यांची सोमवारी भेट घेतली. त्यानंतर अजय माकन, मल्लिकार्जुन खरगे, के सी वेणुगोपाल यांच्यासह कमलनाथ यांनी सोनियांची भेट घेतली.
पक्षातील या वरिष्ठ नेत्यांनी विचारमंथन केलं. राजस्थानमध्ये अनेक अटी घालणाऱ्या आमदारांवर पक्ष नेतृत्व नोटीशीची कारवाई करू शकते.
पर्यवेक्षकांकडून सोनिया गांधी यांनी राजस्थानमधील संपूर्ण स्थितीचा अहवाल मागितला आहे. त्यानंतर सोनिया गांधी आमदारांविरुद्ध कारवाई करू शकतात, असं म्हटलं जातंय.