मुंबई | 03 डिसेंबर 2023 : भारतातील पाच राज्य अन् लोकसभा निवडणुकीआधी होणारी एक मोठी निवडणूक… पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या देशातील लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल… या राज्यातील निकाल देशाचा सध्याचा राजकीय मूड काय आहे ते सांगणार आहेत. थोडक्यात काय तर देशातील जनतेच्या मनात काय आहे? याची ही लिटमस टेस्ट आहे. राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा आणि मिझोरम या राज्यात निवडणूक प्रक्रिया पार पडतेय. मतदान पार पडलं आहे. आणि आता आज निकाल लागणार आहे. पण यातल्या राजस्थान, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि तेलंगणा याच राज्यातील निकाल आज लागतील. या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.
सर्वच पक्षाच्या नेत्यांचं राजकीय भवितव्य मतपेटीत कैद झालं आहे. या चारही राज्यातील मतमोजणीला सुरुवात झाली आहे. आता एक-एक EVM मशीनमधील मतं आता मोजली जातील आणि थोड्याच वेळात पहिला कल सर्वांसमोर येईल.
राजस्थान हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सगळ्यात मोठं राज्य आहे. त्यामुळे या निकालाकडे अवघा देश लक्ष देवून आहे. राजस्थानमधील निकालाकडे सर्वांचं लक्ष आहे. राजस्थानमध्ये 200 जागांसाठी निवडणूक झाली. इथं एकाच टप्प्यात 25 नोव्हेंबर मतदान झालं. या निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपमध्ये मुख्य लढत झाली. सध्याचे विद्यमान मुख्यमंत्री अशोक गहलोत यां
तेलंगणा… देशातील सर्वात नवं राज्य 2014 ला या राज्याची निर्मिती झाली. इथं तिसऱ्यांचा विधानसभा निवडणूक होतेय. 119 जागांवर एकाच टप्प्यात 30 नोव्हेंबरला मतदान झालं. आता आज या राज्याचा निकाल सर्वांसमोर असेल. जेव्हापासून तेलंगणाची निर्मिती तेव्हापासून के चंद्रशेखर राव यांच्याकडे एकहाती सत्ता आहे. मात्र यंदा काँग्रेसनेही आपली पूर्ण ताकद तेलंगणामध्ये लावली आहे. भाजपही तयारीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरली. त्यामुळे कोण विजयी होतं हे पाहावं लागेल.
मध्यप्रदेशमध्ये ही प्रतिष्ठेची लढाई झाली आहे. भाजप विरूद्ध काँग्रेस अशी ही लढाई होतेय. एक्झिट पोलमध्ये शिवराज सिंह चौहान आघाडीवर दिसत आहेत. मात्र काँग्रेसने एक्झिट पोल मानायला नकार दिला आहे. आम्ही बहुमताने जिंकू, असा विश्वास कमलनाथ यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आज निकाल काय लागणार याकडे सर्वाचं लक्ष असेल.
छत्तीसगडमध्येही अटीतटीची लढाई बघायला मिळतेय. काँग्रेस आणि भाजपमध्ये अटीतटीची लढाई आहे. भूपेश बघेल यांच्यासाठी ही प्रतिष्ठेची लढाई आहे.