मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर तमिळनाडूच्या (Tamil Nadu) राजकारणात निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्षांची सक्रियता वाढली आहे. पुढच्या वर्षी ‘थलायवा’ रजनीकांत निवडणुकीच्या रिंगणात उतरणार का?, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात निर्माण झाला आहे. सोमवारी (30 नोव्हेंबर) अभिनेता रजनीकांत यांनी त्यांच्या ‘रजनी मक्कल मंद्रम’ या पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक बोलावली आहे (Rajinikanth Political Party Meeting). या बैठकीत ते आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे (Rajinikanth Tamil Nadu Political Party urgent Meeting on 30 November 2020).
तमिळनाडूमधील पुढील विधानसभा निवडणुकीपूर्वी सुपरस्टार रजनीकांत राजकारणाच्या रिंगणात प्रवेश करण्याबाबत अनेक शक्यता वर्तवल्या जात आहेत. त्यामध्येच रजनीकांत विधानसभा निवडणुका लढवू शकतात, असे संकेत त्यांच्या निवेदनाद्वारे देण्यात आलेले आहेत. रजनीकांत यांच्या या बैठकीवर तामिळनाडूतील सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे. या बैठकीनंतर रजनीकांत विधानसभा निवडणुका लढवणार की, नाही हे निश्चित होईल, असे म्हटले जात आहे.
पुढच्या वर्षी, अर्थात 2021मध्ये तामिळनाडूमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीत रजनीकांत आणि त्यांचा पक्ष काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आजच्या बैठकीनंतर या प्रश्नाचे उत्तर मिळू शकते. रजनीकांत यांनी यासंदर्भात आपले निवेदन जारी केले आहे. यात म्हटले आहे की, ‘ते आधी रजनी मक्कल मंद्रमच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतील, त्यानंतर ते विधानसभा निवडणूक लढविणार की नाही याचा निर्णय घेतील.’ (Rajinikanth Tamil Nadu Political Party urgent Meeting on 30 November 2020)
गेली दोन वर्षे रजनीकांत राजकारणात सक्रिय आहेत. परंतु, अधिकृतपणे त्यांनी अद्याप राजकारणात प्रवेश केलेला नाही. मात्र, त्यांचे सहकलाकार कमल हसन आणि रजनीकांत यांनी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर या दोन्ही पक्षांमध्ये युती होऊ शकते, असे मानले जात आहे.
रजनीकांत यांची किडनीची स्थिती खराब असल्याने डॉक्टरांनी रजनीकांत यांना दगदग, धावपळ आणि दीर्घ प्रवास न करण्याचा सल्ला होता. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर प्रवास करणे धोकादायक असल्याचे सांगितले होते. कोरोनाची लस हाच कोरोनावरील एकमेव उपाय आहे. ती येईपर्यंत कोरोनाचा धोका कायम असेल. रजनीकांत यांचे शरीर कोरोना सहन करु शकेल की नाही याविषयी डॉक्टरांनी काळजी व्यक्त केली होती.
दरम्यान, मागील 2 वर्षांपासून रजनीकांत अनेक राजकीय आणि सामाजिक विषयांवर पुढाकार घेऊन बोलले आहेत. मात्र, चित्रपटसृष्टीतील त्यांचे सहकारी कमल हसन यांच्या तुलनेत त्यांचा औपचारिक राजकीय प्रवेशाला मात्र बराच उशीर झाला आहे. दुसरीकडे अभिनेता कमल हसन यांच्या ‘मक्कल नीधी मैयाम’ पक्षाने मागील लोकसभा निवडणुकीतही आपले उमेदवार उतरवले होते.
(Rajinikanth Tamil Nadu Political Party urgent Meeting on 30 November 2020)
Nashik NCP | नाशिकमध्ये राष्ट्रवादी स्वबळावर लढणार ?#NashikNCPhttps://t.co/xkO3gNFq3l
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 30, 2020