कोल्हापूर: केंद्र सरकारने कोरोना काळात नागरिकांना दिलासा देण्यासाठी काही ना काही पॅकेज दिले. मात्र, महाराष्ट्र सरकारने एकही पॅकेज दिले नसल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला आहे. वाढीव वीजबिल माफ करुन राज्य सरकारनं दिलासा द्यावा, अशी मागणी राजू शेट्टींनी केली. इचलकरंजी शहरात सर्व पक्षीय कृती समितीच्यावतीने वीजबिलमाफी मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी राजू शेट्टी बोलत होते. वीजतज्ज्ञ प्रताप होगाडे, आमदार प्रकाश आवाडे, सागर चाळके यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. ( Raju Shetti criticize state government over electricity bills issue)
राजू शेट्टींनी महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वय नाही, अशी टीका केली. राज्याचे राज्यमंत्री ऊर्जामंत्री नितीन राऊत प्रत्येक वेळी आपली विधाने बदलतात. त्यांच्या विधानं बदलण्याला कोणत्या पक्षाचा पाठिंबा आहे? कोणत्या नेत्याचे त्यांना बळ आहे, हे जाहीर होणे गरजेचे आहे, असं राजू शेट्टी म्हणाले.
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य गोरगरीब जनता यांच्यावर लॉकडाऊनमुळे घाला घातला गेला. पोलिसी बळाचा वापर करत जनतेला तीन महिन्यांहून अधिक काळ घरात कोंडून ठेवलं गेलं. राज्य सरकारनं पोलिसांचा वापर करत दंडही वसूल केले हे चुकीचे होते. घरात बसलेल्या सर्वसामान्य जनतेला शेतकऱ्यांना, कर्मचाऱ्यांना दिलासा म्हणून वीजबिल माफी केलीच पाहिजे. आता जर त्यांनी वीजबिल नाही भरले तर कनेक्शन कट करण्याची भाषा वापरली जातीय. मात्र, वीज कनेक्शन तोडण्याचा प्रयत्न झाल्यास त्याला आमच्या पद्धतीने उत्तर दिले जाईल, असा सज्जड दम देखील शेट्टी यांनी यावेळी दिला. ( Raju Shetti criticize state government over electricity bills issue)
ऊर्जा मंत्री नितीन राऊत त्यांचा खरपूस समाचार घेत त्यांच्याकडे जर अधिकार नसतील तर त्यांनी खुर्चीवरून खाली उतरावे , असे देखील शेट्टी म्हणाले.
आमदार प्रकाश आवाडे म्हणाले, राज्य शासनाने नोकरी करणाऱ्या नागरिकांना वीज बिलाच्या सवलतीतून म्हणून कमी केले तरी चालेल. ज्यांचे उद्योग चांगले चालू आहेत, नोकरदार वर्ग आहे, असे सोडून जे खरोखर गरीब आहेत, ज्यांना कोरोना कालावधीमध्ये सर्वात जास्त झळ पोहोचली, अशा सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने वीजबिल माफी करावी, अशी मागणी प्रकाश आवाडेंनी केली. प्रताप होगाडे यांनी वीजबिलाबाबतची माहिती विशद केली केली. याप्रसंगी कृती समितीचे निमंत्रक सदा मलाबादे, बजरंग लोणारी यांनी मनोगत व्यक्त केली ( Raju Shetti criticize state government over electricity bills issue)
दरम्यान, इचलकरंजी शहरामध्ये वीजदरवाढी विरोधात मोठा मोर्चा निघेल त्यात विद्यमान खासदार धैर्यशील माने यांच्यासह महाविकासआघाडीमधील मधील शहरातील लोकप्रतिनिधींचा सहभाग असेल, अशी चर्चा सोशल मीडियावर रंगली होती. मात्र, महाविकास आघाडीच्या एकाही पदाधिकाऱ्याने मोर्चामध्ये सहभाग नोंदवला नाही. त्यामुळे मोर्चातील नागरिकांमध्ये महाविकासआघाडीचे लोकप्रतिनिधी सत्तेत असले म्हणून काय झाले, गोरगरिबांची वीजबिल माफ व्हावीत, यासाठी त्यांनी रस्त्यावर उतरायला हवे होते, अशी चर्चा होती. मोर्चामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, ताराराणी पक्ष, डावे व पुरोगामी विचार आघाडी, वीजग्राहक संघटना, यासह विविध यंत्रमाग संघटनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला
वाढीव वीज बिलावर एकत्र येऊन तोडगा काढायला हवा, मोर्चे नाही, खा. धैर्यशील मानेंचा राजू शेट्टींना टोलाhttps://t.co/sPGyWwCMUb#Shivsena #RajuShetti
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 24, 2020
संबंधित बातम्या:
वीज बिल माफीसाठी शेतकरी संघटनेचा मोर्चा, वीज ग्राहकांनाही सहभागी होण्याचं राजू शेट्टींचं आवाहन
सरकारमध्ये दम असेल तर वीज बिलाची वसुली करुन दाखवावीच; राजू शेट्टींचे आव्हान
( Raju Shetti criticize state government over electricity bills issue)