मुंबई : राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे (heavy rain) शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा सोयाबीन, कापूस आणि बाजरी या पिकाला बसला आहे. विरोधकांकडून राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत आहे. तर दुसरीकडे मात्र कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी स्थिती नसल्याचं म्हटलं आहे. अब्दुल सत्तार यांच्या या वक्तव्यावरून शेतकरी नेते राजू शेट्टी (Raju Shetty) चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी सत्तारांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
राजू शेट्टी यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. आमचे कृषीमंत्री म्हणतात राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही. 20 गुंठे जमीन असणाऱ्या एका छोट्या शेतकऱ्याला पन्नास हजार रुपये हे डोंगराएवढेच असतात. त्याला एक रुपया गाडीच्या चाका एवढा असतो. मात्र हे पन्नास हजार रुपये तुमच्या पन्नास खोक्यांपुढे कमी असतील असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका हा कापूस, सोयाबीन आणि बाजरी या पिकाला बसला आहे. ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नसल्याचं सत्तार यांनी म्हटलं आहे. आम्ही पावसामुळे झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. वस्तुनिष्ठ पंचनामे होऊन शेतकऱ्यांना मदत मिळेल असं सत्तार यांनी म्हटलं आहे.