मुंबई : राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार निवडणूक रिंगणार आहेत. सकाळी मतदानाला सुरुवात झाली. यावेळी राज्यसभेचे भाजपचे उमेदवार (Candidate) अनिल बोंडे म्हणाले, मला शंभर टक्के आत्मविश्वास आहे. धाकधूक नाही. कारण धाक फक्त फक्त देवेंद्र फडणवीसांचा (Devendra Fadnavis) आहे. धूक फक्त महाविकास आघाडीची (Mahavikas Aghadi) आहे. अनिल बोंडे म्हणाले, एक गोष्ट लक्षात घ्या. मी बऱ्याच लोकांना विचारलं. महाभारतात अश्वस्थामा गेला. तसा या निवडणुकीत कुणीतरी संजय जाणार आहे. अश्वस्थामा कोणता गेला ते धर्मराजानं सांगितलं नव्हतं. त्यामुळं कोणता संजय जाणार आहे. हे मीही सांगणार नाही. कोणता संजय जाणार हे लवकरच माहिती होईल. महाविकास आघाडीतला संजय कोणतातरी जाणार आहे. नरो वा कुंजरोवा, असं अश्वस्थामाच्या बाबतीत म्हटलं होतं. त्याप्रमाणं कोणतातरी संजय जाणार आहे. ते साडेपाचनंतर माहीत पडेल, असं हसत असत महाविकास आघाडीतल्या महाभारतावर अनिल बोंडे यांनी बोट ठेवलं.
अनिल बोंडे यांनी सांगितलं की, भारतीय जनता पक्षाचे तिन्ही उमेदवार निवडून येतील. पीयूष गोयल, अनिल बोंडे, धनंजय महाडीक हे शंभर टक्के विजयी होणार आहेत. कारण देवेंद्र फडणवीसांचा धाक आहे आणि त्यांच्या मनात म्हणजे महाविकास आघाडीच्या मनात धूक आहे. मतदानाच्या आधी आमचा संजय जाणार असं ते कसं म्हणणार, असंही अनिल बोंडे म्हणाले.
राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार निवडणूक रिंगणार आहेत. त्यामुळं त्यापैकी एक उमेदवार पराभूत होणार आहे. भाजपचे पीयूष गोयल, अनिल बोंडे यांचा विजय निश्चित मानला जात आहे. धनंजय महाडीक आणि संजय पवार यांच्यात खरी लढत आहे. या दोनपैकी कोणताही एक उमेदवार निवडून येईल. शिवसेनेचे संजय राऊत, राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल, काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी यांचाही विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. शिवसेनेच्या संजय पवारांची जागा धोक्यात असल्याचा इशारा अनिल बोंडे यांनी दिला. कोणता संजय आउट होणार हे, सायंकाळी पाच वाजतानंतर स्पष्ट होईल, असंही अनिल बोंडे यांनी सांगितलं. धनंजय महाडीकांची थेट लढत संजय पवार यांच्याशी आहे.