Rajya Sabha Election: जिंकल्यावर पार्टी करू, आपलं ऐक्य दाखवा, मतदान करताना काळजी घ्या; मुख्यमंत्र्यांचं आवाहन

| Updated on: Jun 07, 2022 | 9:29 PM

हॉटेल ट्रायडंटमध्ये महाविकास आघाडीच्या सर्व आमदारांची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आमदारांना मार्गदर्शन केलं. त्यावेळी मुख्यमंत्री ठाकरे, शरद पवार आणि खरगे यांनी आमदारांना मार्गदर्शन केलं.

Rajya Sabha Election: जिंकल्यावर पार्टी करू, आपलं ऐक्य दाखवा, मतदान करताना काळजी घ्या; मुख्यमंत्र्यांचं आवाहन
महाविकास आघाडी आमदारांची बैठक
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या (Rajya Sabha Election) तोंडावर महाविकास आघाडीकडून शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. हॉटेल ट्रायडंटमध्ये महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) सर्व आमदारांची बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी आमदारांना मार्गदर्शन केलं. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), शरद पवार आणि खरगे यांनी आमदारांना मार्गदर्शन केलं. मतदान करताना काळजी घ्या, मतदान करताना काळजी घ्या, आपलं ऐक्य दाखवा. किमान समान कार्यक्रमावर अधिक भर देणार, असं उद्धव ठाकरे बैठकीत म्हणाल्याची माहिती मिळतेय. तर सर्वांनी महाविकास आघाडीच्या जागा जिंकून आणा, असा आदेश शरद पवार यांनी आमदारांना दिलाय.

मुख्यमंत्र्यांचा भाजपला जोरदार टोला

बैठकीनंतर बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा दावा केलाय. त्याचबरोबर त्यांनी भाजपला जोरदार टोलाही हाणलाय. एक परंपरा आपण पाळत आलो आहोत. सभ्यता आणि राजकारण या दोन्ही गोष्टी परस्पर विरोधी असल्या तरी राजकारणात थोडीफार सभ्यता असायला हरकत नाही. 22-23 वर्षानंतर ही निवडणूक होत आहे. शेवटची राज्यसभेची निवडणूक कधी झाली होती हे आठवावं लागतं. त्यामुळे सभ्यता पाळायाला हरकत नव्हती. असं मुख्यमंत्री म्हणाले.

‘मविआचे चारही आमदार राज्यसभेवर जाणारच’

इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होणारच असा दावा केलाय. पत्रकारांनी आमदारांना काय संबोधन केलं असा प्रश्न विचारला त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी मिश्किलपणे उत्तर दिलं. असं संबोधन सांगण्यासारखं असतं तर तुम्हाला आतमध्ये बोलावलं असतं. त्याचवेळी कोणी कितीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडीचे चारीचे चारी उमेदवार राज्यसभेत निवडून जाणारच, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केलाय.

अडीच वर्षानंतर महाविकास आघाडीचं शक्तीप्रदर्शन

महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेवेळीही असंच काहीसं चित्र राज्यात पाहायला मिळालं होतं. देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्यासोबत पहाटेचा शपथविधी केला. त्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली होती. मात्र, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी एकत्र येत भाजपसमोर तगडं आव्हान उभं केलं. पवारांनी मोठी खेळी करत महाविकास आघाडीची स्थापना केली. त्यावेळीही पवार, ठाकरे आणि थोरातांच्या नेतृत्वात जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं होतं. राज्याच्या राजकारणातील ते चित्र आजही अनेकांना आठवत असेल. महाविकास आघाडीला अडीच वर्षे पूर्ण झाल्यानंतर आज पुन्हा एकदा तेच चित्र हॉटेल ट्रायडंटमध्ये पाहायला मिळणार आहे.