मुंबई : राज्यसभा निवडणुकीत भाजपनं देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिलाय. राज्यसभेच्या सहा जागांसाठी झालेल्या निवडणुकीत 3 जागांवर भाजपनं दणदणीत विजय मिळवला. तर 3 जागा महाविकास आघाडीच्या पदरात पडल्या आहेत. त्यात शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी आणि काँग्रेसला प्रत्येकी एक जागा मिळाली. यात शिवसेनेला सर्वाधिक मोठा झटका बसलाय. कारण, राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेनं प्रतिष्ठा पणाला लावली होती. पण भाजपच्या धनंजय महाडिकांनी सेनेच्या संजय पवारांचा पराभव केलाय. या निवडणुकीतील विजयाचं सर्व श्रेय भाजप नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस यांना दिलं जात आहे. हा विजय फडणविसांच्या डोक्याचा आणि रणनितीचा असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील आणि प्रवीण दरेकरांनी दिलीय. त्यानंतर आता सोशल मीडियावर एक पोस्ट चांगलीच व्हायरल होत आहे. या निवडणुकीतून भाजपकडून काय शिकायला मिळालं? अशी ती पोस्ट आहे. तर आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी आपल्या खास शैलीत निवडणूक निकालातील मुद्दे आणि गुद्दे सांगितले आहेत!
◆ काँग्रेसने शिवसेनेला मदत केली नाही.
◆ भाजपाकडे 113 मतांचा कोटा असताना 123 मते कशी व कुठून आली?
◆ शिवसेनेच्या प्रथम पसंतीचे उमेदवार संजय राऊत यांच्यापेक्षा भाजपाच्या धनंजय महाडिक यांची मते अधिक
◆ नेत्याची काळजी आणि शिवसैनिक वाऱ्यावर?
◆ MIM ची मते घेऊन औरंगजेबी युती अखेर केलीच, आता औरंगाबाद नामांतराचे काय?
◆ सपाची मते ही चालवून घेतली तेव्हा ह्रदयातला राम कुठे काढून ठेवला?
◆ आता सांगा कोण कुणाची बी टिम?
◆ महाराष्ट्रात संजय पवार हारतो आणि इम्रान प्रतापगढी जिंकतो, हे “प्रताप” महाराष्ट्र बघतोय.
◆ उघड मतदानात जे चित्र समोर आले त्याने एवढे बावचळलेत. विधानपरिषद निवडणूक गुप्त मतदानाने, तेव्हा काय करणार?
◆ अंतर्विरोधाचा तिन तिघाडा किती दिवस झाकणार?
◆ भाजप नेत्यांच्या घरातील तथाकथित अनधिकृत बांधकामे शोधण्यापेक्षा सरकारमधील फूट शोधण्याचा किमान समान कार्यक्रम राबवा!
/राज्यसभा निकाल/ काही मुद्दे आणि गुद्दे
◆काँग्रेसने शिवसेनेला मदत केली नाही.
◆भाजपाकडे 113 मतांचा कोटा असताना 123 मते कशी व कुठून आली?
◆शिवसेनेच्या प्रथम पसंतीचे उमेदवार संजय राऊत यांच्यापेक्षा भाजपाच्या धनंजय महाडिक यांची मते अधिक
◆नेत्याची काळजी आणि शिवसैनिक वाऱ्यावर?
1/3— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) June 11, 2022
✍️अचूक नियोजन व त्यासाठी योग्य व्यक्तीची निवड करून फडणवीसांनी फासे टाकले. मी जे सांगतोय तेच करा तर विजय मिळवून देतो, या वाक्याला ध्यानात ठेवून तंतोतंत मार्गक्रमण केलं. अश्विनी वैष्णव, चंद्रकांत दादा, गिरीश महाजन, आशिष शेलार, प्रसाद लाड यांची साथ घेऊन इतरांना संपूर्क साधून करेक्ट आकडा जमा केला. त्यांच्या या नियोजनामुळे केंद्रीय नेतृत्वही जबर खुश असेल.
✍️थोडं काही मनासारखं घडलं नाही की फडणवीस जबाबदार हे वाक्य ठरलेलं होतं. कुणाला तिकीट मिळालं नाही की फडणवीस जबाबदार, भाजपामध्ये काहीही घडू द्या त्याला फडणवीस जबाबदार, प्रत्येक कृतीत चूक शोधून टारगेट करणे, मी नसेल तर काय होईल बघू या अविर्भावात राहून संधी मिळेल तिथे अडचण निर्माण करणे, या गोष्टीला आता ब्रेक लागेल.
✍️2019 च्या मेगा भरतीत भाजपवासी झालेल्या लोकांबाबत राष्ट्रवादी नेहमी म्हणायची की हे आमच्या संपर्कात आहेत, ते आमच्या संपर्कात आहेत. काही आमदारांची चलबिचल सुरु होती. पण या निकालाने त्यांना आपण योग्य प्लेटफॉर्म वर असल्याची जाणीव झाली.
✍️पराभूत होऊनही जमिनीवर उतरून जो आक्रमक भूमिका घेईल त्यांचे पुनर्वसन नक्की होईल अन त्याचे उदाहरण म्हणजे अनिल बोडें, पडळकर, बावनकुळे यांच्यासह इतर लोकांनी पक्ष देईल ती जबाबदारी पार पाडली. त्यांना त्याचे बक्षीस मिळाले आहे. इतरांनी अलिप्त राहण्याचा प्रयत्न केला तर त्यांना अलिप्तच राहावं लागेल हा संदेश मिळाला.
✍️गिरीष महाजन, आशिष शेलार, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर, नितेश राणे यांना संगठनात्मक प्रशिक्षणासह घटनात्मक पेच यावर प्रशिक्षित करून डावपेचात तरबेज केलं गेलं. त्याचेच उदाहरण म्हणजे सुहास कांदे यांच मत नितेश राणे यांच्यामुळे रद्द होणे. कांदेच्या घटनाबाह्य कृतिला नितेश राणे यांनीच सर्वात प्रथम टीपून आशीष शेलार यांचे लक्ष वेधले होते.
✍️आखलेल्या रणनितीची जाहीर वाच्यता न करणे, फक्त मुद्देसुद बोलणे, अचूक नियोजन आणि करेक्ट कार्यक्रमाच्या बैठकीतील मुद्दे बाहेर न येऊ देणे, तसंच केलेल्या प्लानिंगला जमिनीवर उतरवणे, या बाबी अगदी करेक्ट केल्या गेल्या.
✍️आपल्या पक्षातील बैठकांची कसलीच माहिती मिडियाला समजू न देणे, संबंधित विरोधी नेत्यांच्या टीकेवर फक्त काऊंटर टिका करणे, आम्हाला यांचा पाठिंबा, आम्ही यांच्या संपर्कात, आमची त्यांच्या सोबत बोलणी, असली वायफळ बडबड न करता, मिडिया सह विरोधकांना गाफिल ठेवण्यात यशस्वी
✍️आपल्या तसंच विरोधी पक्षातिल आमदारांशी आत्मियतेचे संबंध ठेवत सर्वांना मानसन्मान देणं ही फडणवीस यांची जमेची बाजू ठरली, त्यातुन शब्दाला वजन प्राप्त होऊन मदत मिळत गेली.