मुंबई : उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असताना राज्यसभेच्या निवडणुकीची चुरस (Rajyasabha Election) वाढत चालली आहे. आतापर्यंत तीन राजकीय पक्षांकडून पाच उमेदवरांची घोषणा करण्यात आली होती. तर एक जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे. त्यामुळे आत्ताची स्थिती पाहता राज्यसभेचा कोटा पूर्ण होताना दिसत होता. मात्र भाजप (BJP) या निवडणुकीत आणखी रंगत आणत आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने भाजप या निवडणुकीत आणखी एक उमेदवार उतरवला आहे. भाजपने कोल्हापूर विरुद्ध कोल्हापूर असा सामना आता रंगवला आहे. कोल्हापुरातले भाजप नेते आणि माजी खासदार धनंजय महाडिक (Dhananjay Mahdik) यांना भाजपने राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे आता ही निवडणूक आणकी रंगतदार झाली आहे. कोल्हापूर विरुद्ध कोल्हापूर सामन्यात आता कोण बाजी मारणार? हे लवकरच कळेल.
सहाव्या जागेसाठी सुरूवातीपासूनच शिवसेना जोर लावताना दिसत आहे. गेल्या निवडणुकीवेळीच सहाव्या जागेबाबत शिवसेना आणि राष्ट्रवादीच वाटाघाटी झाल्या होत्या. त्यामुळेच राजे शिवसेनेकडून लढले नाहीत तरी शिवसेनेने संजय पवार यांना मैदानात उतरवलं. सहावी जागा शिवसेनेच्या गोटात यावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी अपक्ष आमदारांची बैठकही काही दिवसांपूर्वीच घेतली आहे. त्यामुळे भाजपला ही जागा जिंकणे किती शक्य आहे. याबबातही साशंकता आहे. मात्र सध्या तरी ही निवडणूक धनंजय महाडिक यांच्या एन्ट्रीने आणकी चुरशीची झाली आहे, एवढं मात्र नक्की.