मुंबई : राज्यसभा निवडणुकीनंतर सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी तोंडभरून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं कौतुक केलंय. “यॉर्कर असो वा गुगली… देवेंद्रजी प्रत्येक चेंडूवर षटकार मारतात”, असं सदाभाऊंनी म्हटलंय. त्यांनी ट्विट करत फडणवीसांसह भाजपच्या विजयी उमेदवारांचं कौतुक केलंय. “नवनिर्वाचित खासदार पियुषजी गोयल, अनिलजी बोंडे आणि धनंजयजी महाडिक यांचे मन:पूर्वक अभिनंदन! यॉर्कर असो वा गुगली. देवेंद्रजी प्रत्येक चेंडूवर षटकार ठोकतायंत हे पुन्हा सिद्ध झालं.’देवेंद्र फडणवीस’ सिर्फ नाम काफी है… देवेंद्रजी आप आगे बढो, हम आपके साथ है”, असं ट्विट त्याने केलं आहे.
सदाभाऊ खोत यांनी ट्विट करत फडणवीसांसह भाजपच्या विजयी उमेदवारांचं कौतुक केलंय. “नवनिर्वाचित खासदार पियुषजी गोयल, अनिलजी बोंडे आणि धनंजयजी महाडिक यांचे मन:पूर्वक अभिनंदन! यॉर्कर असो वा गुगली. देवेंद्रजी प्रत्येक चेंडूवर षटकार ठोकतायंत हे पुन्हा सिद्ध झालं.’देवेंद्र फडणवीस’ सिर्फ नाम काफी है… देवेंद्रजी आप आगे बढो, हम आपके साथ है”, असं ट्विट त्याने केलं आहे.
नवनिर्वाचित खासदार मा.श्री.पियुषजी गोयल, मा.श्री.अनिलजी बोंडे आणि मा.श्री.धनंजयजी महाडिक यांचे मन:पूर्वक अभिनंदन!!
यॉर्कर असो वा गुगली. देवेंद्रजी प्रत्येक चेंडूवर षटकार ठोकतायंत हे पुन्हा सिद्ध झालं.
‘देवेंद्र फडणवीस’ सिर्फ नाम काफी है…
देवेंद्रजी आप आगे बढो, हम आपके साथ है. pic.twitter.com/N5RrpbVCd4— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) June 11, 2022
राज्यसभेपोठोपाठ सध्या विधानपरिषद निवडणुकीचं वारं वाहतंय. 8 जूनला भाजपने आपल्या विधानपरिषदेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यात प्रवीण दरेकरांसह प्रसाद लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली. पण यात पंकजा मुंडेंना डावलण्यात आलं. तर उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्यावेळी सदाभाऊ खोत यांना भाजपने पाठिंबा दिला. मध्यंतरीच्या काळात सदाभाऊ खोत यांनी आणि गोपीचंद पडळकरांनी बरीच आंदोलनं केली. एसटी संपाच्या वेळीही त्यांनी आझाद मैदानावर जात संपाला पाठिबा दिला होता. त्याचंच हे फळ असल्याचं बोललं जातंय.