मुंबई : काँग्रेसने चौथ्या जागेचा आग्रह सोडल्यामुळे महाविकास आघाडीच्या गोटातील राज्यसभेच्या चौथ्या जागेचा तिढा अखेर सुटला आहे. महाराष्ट्रामधल्या चौथ्या जागेसाठी राष्ट्रवादीकडून फौजिया खान उमेदवारी अर्ज भरणार आहेत. (Rajyasabha Seat NCP Congress Dispute Solved)
राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या सात जागांपैकी चार जागा महाविकास आघाडीला मिळणार आहेत. काँग्रेस आणि शिवसेना प्रत्येकी एक जागा लढवणार आहे, तर राष्ट्रवादीला दोन जागा मिळणार आहेत. चौथ्या जागेबाबत काँग्रेस अडून बसली होती, पण महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या उपस्थितीत झालेल्या समन्वय समितीच्या बैठकीत अखेरीस वादावर तोडगा निघाला आहे.
अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून काँग्रेसकडून राजीव सातव, राष्ट्रवादीकडून फौजिया खान आणि शिवसेनेकडून प्रियांका चतुर्वेदी आज अर्ज भरणार आहेत. यंदाची राज्यसभा निवडणूक बिनविरोध होणार असून 26 मार्चला केवळ मतदानाची औपचारिकता असेल.
राज्यसभेच्या तीन जागांवर भाजपचा दावा आहे. भाजप उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले आणि भाजपच्या कोट्यातून रिपाइं अध्यक्ष रामदास आठवले यांनी कालच अर्ज दाखल केले होते.
राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने छत्रपती उदयनराजे भोसलेजी व केंद्रीय मंत्री रामदास आठवलेजी यांनी रिपब्लिकन पक्षातर्फे आज उमेदवारी अर्ज भरला. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह पक्षाचे आमदार व इतर मान्यवर उपस्थित होते…! pic.twitter.com/B28l0O8EUj
— Girish Mahajan (@girishdmahajan) March 12, 2020
हेही वाचा : राज्यसभा निवडणूक : निष्ठावंतांना डावललं, शिवसेना-भाजपची आयारामांवर भिस्त
राज्यसभेची उमेदवारी देताना शिवसेना आणि भाजपने ज्येष्ठ नेत्यांना डावलल्याचं चित्र आहे. सेना-भाजपने गेल्या वर्षभरात पक्षात प्रवेश करणाऱ्या आयाराम नेत्यांना तिकीट दिलं आहे.
महाराष्ट्रातील 7 जागांसाठी उमदेवार
राज्यसभा नियुक्तीसाठी निकष काय?
राज्यसभेवर निवडून जाण्यासाठी उमेदवाराला पहिल्या पसंतीची 37 मतं आवश्यक आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचे चार तर भाजपचे दोन उमेदवार सहज निवडून येतील. शिल्लक राहिलेल्या मतांमधून भाजप आणखी एक उमेदवार निवडून आणेल.
राज्यसभेशी संबंधित 9 बातम्या :
मला देशाच्या नाही, राज्याच्या राजकारणात रस : एकनाथ खडसे
मला राहू द्या, निदान खडसेंना तरी तिकीट द्यायला हवं होतं : संजय काकडे
‘उमेदवारीसाठी धन्यवाद सोनियाजी’, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा राज्यसभेसाठी नकार
राहुल गांधींचा विश्वासू मोहरा राज्यसभेवर, महाराष्ट्रातून काँग्रेसचा उमेदवार निश्चित
संजय काकडेंचा पत्ता कट, खडसेंनाही तिकीट नाही, राज्यसभेसाठी भाजपची दुसरी उमेदवार यादी
गोपीनाथ मुंडेंकडून पक्षप्रवेश, भाजपचे राज्यसभा उमेदवार भागवत कराड कोण आहेत?
काँग्रेस रिटर्न प्रियांका चतुर्वेदींना शिवसेनेचं तिकीट, खैरे, रावतेंना डावललं
राज्यसभेसाठी फक्त शरद पवारांचा उमेदवारी अर्ज, काँग्रेसच्या भूमिकेमुळे फौजिया खान वेटिंगवर
राज्यसभेच्या सातव्या जागेसाठी रणनीती, संजय राऊत शरद पवारांच्या भेटीला
(Rajyasabha Seat NCP Congress Dispute Solved)