मुंबई: भाजप आमदार राम कदम ( Ram Kadam) यांनी यवतमाळमध्ये पोलिओ लसीकरणावेळी 12 लहान मुलांना सॅनिटायझर पाजलं गेल्याच्या घटनेचा निषेध केला आहे. राम कदमांनी यवतमाळच्या घटनेवरुन ठाकरे सरकारनं भंडाऱ्याच्या 10 कोवळ्या बाळांची हत्या केली आणि यवतमाळमध्ये सॅनिटायझर पाजल, असा आरोप केला. पोलिओ लसीकरणावेळी सॅनिटायझर पाजल्यामुळे यवतमाळमध्ये 12 चिमुकल्यांची प्रकृती बिघडली होती. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या हलगर्जीमुळे पाच वर्षांखालील चिमुरड्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग यांनी या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून याप्रकरणी एक जणाचे निलंबन करण्यात आले आहे. (Ram Kadam slams Thackeray Government over Yavatmal Sanitizer giving to child instead of Polio)
राम कदम यांनी यवतमाळच्या घटनेवर बोलताना महाराष्ट्र सरकार आणि सरकारच्या अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणाची सीमा ओलांडल्याचा आरोप केला. यवतमाळमध्ये 12 लहान बालकांना पोलिओचा डोस म्हणुन सॅनिटायझर पाजलं. आज त्या 12 बालकांचा जीव धोक्यात आहे,.या आधी सरकारच्या निष्काळजीपणामुळे भंडाऱ्यात 10 कोवळ्या मुलांचा जीव गेला. ठाकरे सरकारने त्या कोवळ्या मुलांची हत्या केली, असा आरोप राम कदमांनी केला.
हे सरकार करतय तरी काय ?
भंडाऱ्याच्या घटनेवर अजूनही एफआयआरची नोंद झालेली नाही. हे सरकार करतय तरी काय, असा सवाल राम कदमांनी उपस्थित केला.केवळ बदल्या बदल्या आणि बदल्या एवढेच या सरकारचे सुरु आहे. भंडारा आणि यवतमाळ या दोन्ही घटनांवर एफआयर कधी दाखल करणार, असा सवाल राम कदमांनी ठाकरे सरकारला केला आहे.
आरोग्यमंत्री राजेश टोपे काय म्हणाले?
यवतमाळमध्ये पोलिओऐवजी सॅनिटायझर दिल्याची ही अक्षम्य चूक आहे. संबंधित अंगणवाडी सेविकेवर कारवाई करण्यात आली आहे. त्याविषयीचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे. यवतमाळमधील घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कापसी कोपरी येथे पोलिओ लसीकरणावेळी हा प्रकार घडला. लहान मुलांना पोलिओच्या डोसऐवजी सॅनिटायजर पाजले. 12 लहान बालकांना यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या:
यवतमाळमध्ये पोलिओऐवजी 12 चिमुकल्यांना सॅनिटायजर्स पाजलं, आरोग्यमंत्री टोपेंची कडक कारवाई
पोलिओ लसीकरणावेळी हलगर्जी, सॅनिटायजर पाजल्याने यवतमाळमध्ये 12 चिमुकले रुग्णालयात
(Ram Kadam slams Thackeray Government over Yavatmal Sanitizer giving to child instead of Polio)