मुख्यमंत्र्यांनी पुढच्या सरकारमधील पहिला मंत्री निवडला

| Updated on: Aug 26, 2019 | 6:27 PM

विद्यमान मंत्री राम शिंदा यांना पुन्हा एकदा मंत्री करणार आहे, जेवढी जास्त मतं मिळतील, तेवढंच मोठं खातं मिळेल, असंही मुख्यमंत्री म्हणाले. राम शिंदे यांच्या जामखेड (CM devendra Fadnavis in Jamkhed) मतदारसंघात जाऊन मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. महाजनादेश यात्रेतील भाषणादरम्यान मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी पुढच्या सरकारमधील पहिला मंत्री निवडला
Follow us on

अहमदनगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM devendra Fadnavis in Jamkhed) यांनी त्यांच्या पुढच्या सरकारमधील पहिला मंत्री आत्ताच निवडला आहे. विद्यमान मंत्री राम शिंदा यांना पुन्हा एकदा मंत्री करणार आहे, जेवढी जास्त मतं मिळतील, तेवढंच मोठं खातं मिळेल, असंही मुख्यमंत्री म्हणाले. राम शिंदे यांच्या जामखेड (CM devendra Fadnavis in Jamkhed) मतदारसंघात जाऊन मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. महाजनादेश यात्रेतील भाषणादरम्यान मुख्यमंत्री बोलत होते.

मुख्यमंत्र्यांनी यावेळी जामखेड पाणी पुरवठा योजनेचा आदेशही राम शिंदे यांच्या हातात सुपूर्द केला. पश्चिमेकडील पाणी नगर जिल्ह्यात आणून दुष्काळ कायमचा हटवणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी त्यांनी विरोधकांवरही सडकून टीका केली.

जामखेड मतदारसंघात यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी निवडणूक लढवण्याचा निर्धार केलाय. या मतदारसंघात ते सक्रिय झाले असून जिंकण्याचा विश्वासही व्यक्त केला. त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी जामखेडमध्ये येऊन राम शिंदे यांना पुन्हा मंत्री करणार असल्याचंही सांगितलं.

पाहा व्हिडीओ :