मुंबई : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत (US President Election) रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार (Republican Party) आणि मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) विजयी व्हायला पाहिजे होते, मात्र त्यांनी पराभव मान्य करावा, असा सल्ला रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केले आहे. (Ramdas Athawale advices Donald Trump to accept defeat in US President Election)
“रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी व्हायला हवे होते. मात्र या अटीतटीच्या निवडणुकीत जो बायडेन विजयी झाले. त्यांचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे स्वागत. लोकशाहीचा कौल मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वीकारला पाहिजे” असे आवाहन रामदास आठवले यांनी केले.
अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्ष म्हणून ऐतिहासिक विजय मिळवलेल्या कमला हॅरिस यांचेही रामदास आठवले यांनी अभिनंदन केले आहे. अमेरिकेत स्थायिक भारतीयांना न्याय देण्याचे काम अमेरिकेच्या नवनिर्वाचित उपाध्यक्षा कमला हॅरिस करतील, असा विश्वासही आठवलेंनी व्यक्त केला.
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडेन यांच्या नेतृत्वात अमेरिका आणि भारत दोन्ही राष्ट्रांचे संबंध अधिक दृढ होतील. अमेरिकेच्या सहकार्याने भारताची अर्थव्यवस्था अधिक बळकट होईल, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आलेला लोकशाहीचा कौल मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वीकारावा.अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे आणि अमेरिकेच्या पहिल्या महिला उपाध्यक्षा कमला हॅरीस यांचे हार्दिक अभिनंदन!
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) November 9, 2020
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दुसऱ्यांदा लढून पराभूत झालेले डोनाल्ड ट्रम्प हे गेल्या तीन दशकातील पहिलेच अध्यक्ष ठरले आहेत. अमेरिकेच्या आतापर्यंतच्या इतिहासात अनेक राष्ट्राध्यक्षांना जनतेने पुन्हा निवडून दिले आहे. विशेष म्हणजे गेल्या 100 वर्षात अमेरिकेत पुन्हा निवडणूक लढवणाऱ्या फक्त चार राष्ट्राध्यक्षांना पराभव पदरात पडला आहे.
दरम्यान, रामदास आठवले यांना गेल्या आठवड्यात कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. कालच ते कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी परतले.
संबंधित बातम्या :
Donald Trump | पराभव झाल्यास देश सोडून जावं लागेल, ट्रम्प यांची भावनिक साद
(Ramdas Athawale advices Donald Trump to accept defeat in US President Election)