पाच राज्यातील निवडणुकांसाठी रिपाई रिंगणात, रामदास आठवलेंची घोषणा

| Updated on: Feb 08, 2021 | 4:46 PM

जिथे शक्य होईल तिथे भाजपला पाठिंबा देऊ, असेही रामदास आठवले म्हणाले. (Ramdas Athawale Announce to fight 5 state Election) 

पाच राज्यातील निवडणुकांसाठी रिपाई रिंगणात, रामदास आठवलेंची घोषणा
रामदास आठवले
Follow us on

मुंबई : येत्या वर्षभरात पाच राज्यांमध्ये निवडणुका होत आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या निवडणुका लढवणार आहे, अशी महत्त्वपूर्ण घोषणा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली आहे. रिपाईला किमान 3 ते 4 जागांवर तिकीट मिळावं, यासाठी लवकरच भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेणार आहे. तसेच जिथे शक्य होईल तिथे भाजपला पाठिंबा देऊ, असेही रामदास आठवले म्हणाले. (Ramdas Athawale Announce to fight 5 state Election)

काही महिन्यांपूर्वी बिहार विधानसभा निवडणुका पार पडल्या होत्या. त्यानंतर आता येत्या वर्षभरात आणखी पाच राज्यांमध्ये निवडणुकीचा रणसंग्राम पाहायला मिळणार आहे. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू, पाँडिचेरी या पाच राज्यात निवडणुका होण्याची शक्यता आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार तयारी केली जात आहेत.

नुकतंच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्वेसर्वा रामदास आठवले यांनी या पाच राज्यातील निवडणुका लढवण्याची घोषणा केली आहे. येत्या पाच राज्यात होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये रिपाई लढवणार आहे. रिपाईला किमान 3 ते 4 जागांवर तिकीट मिळावं यासाठी लवकरच आठवले भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेणार आहेत.

“शिवसेना आता काँग्रेस राष्ट्रवादीच्या बिळात” 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आंदोलकांबाबत जे बोलले, त्याचा अर्थ चुकीचा घेतला गेला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली होती. मात्र त्या दोघांमध्ये मुख्यमंत्रिपदाची चर्चा झालेली नाही. शिवसेना आणि आम्ही आधी एकत्र होतो. आता शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या बिळात गेली आहे, असा टोलाही आठवलेंनी लगावला.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी लावलेली चौकशी योग्य नाही. ट्विट करणाऱ्यांना व्यक्तीस्वातंत्र्य आहे. या सरकारची चौकशी करावी लागेल, असेही आठवले म्हणाले. (Ramdas Athawale Announce to fight 5 state Election)

संबंधित बातम्या : 

Ramdas Athawale | रामदास आठवले कोरोनामुक्त, शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची गर्दी

‘आंबेडकरांशिवाय वंचितच्या एकाही उमेदवाराला लाखभर मतेही मिळणार नाहीत’

जानकरांचं दुपारी भाजपवर तोंडसुख, काही तासातच गळाभेट