मुंबई : “उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath ) बॉलिवूडला नोएडाला नेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांचा हा प्रयत्न यशस्वी होणार नाही,” असे म्हणत केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी योगी आदित्यनाथ यांना घरचा आहेर दिला आहे. इलेटक्ट्रिक रिक्षा आणि गुड्स करिअरच्या उद्धाटनासाठी ते मुंबईत आले होते. यावेळी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. (Ramdas Athawale on Yogi Adityanath Mumbai visit)
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्याथ आज महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहे. यावेळी ते मुंबईतील प्रतिष्ठित उद्योगपती तसेच बॉलिवूड निर्मात्यांशी चर्चा करुन उत्तर प्रदेशमध्ये आर्थिक गुंतवणूक वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत. महाविकास आघाडीतर्फे योगींच्या या दौऱ्यावर टीका केली जात आहे. योगी आदित्यनाथ यांच्याकडून बॉलिवूड उत्तर प्रदेशमध्ये हलवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप महाविकास आघाडीतर्फे केला जातोय. या पार्श्वभूमीर प्रतिक्रिया विचारली असता, रामदास आठवले यांनी याोगी आदित्यनाथ यांचा बॉलिवूड उत्तर प्रदेशला नेण्याचा प्रयत्न यशस्वी होणार नाही, असं म्हटलं आहे.
“उतर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बॉलिवूडला नोएडला नेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, तो प्रयत्न यशस्वी होणार नाही. बॉलीवूडचे कलाकार मुंबई सोडून जाण्यास तयार नाहीत,” असे रामदास आठवले म्हणाले. तसेच, योगी आदित्यनाथ यांना याबद्दल प्रयत्न करायचे असतील तर, ते त्यांनी करावेत असे रामदास आठवले म्हणाले.
दरम्यान, बुधवारी (2 डिसेंबर) मुंबईत पत्रकार परिषद घेत आम्ही नवी फिल्मसिटी तयार करायला आलो आहोत, असे योगी आदित्यनाथ म्हणाले. तसेच, बॉलिवूड मुंबईमंध्येच राहील याची ग्वाहीदेखील यावेळी त्यांनी दिली.
“बॉलिवूडमधील दिग्गजांचा अनुभव घेऊन त्यांच्या सूचनेनुसार नवं मॉडल तयार करायचं आहे. वर्डक्लास फिल्मसिटी तयार करण्यासाठी फिल्मी दुनियेच्या लोकांशी मी चर्चा केली. आम्ही कुणाचं काही घेऊन जाणार नाही. आम्हाला नवी निर्मिती करायची आहे. त्यासाठी आलो आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्यावर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी टीका केली आहे. योगी आदित्यनाथ यांच्याकडून राज्यातील गुंतवणूक उत्तर प्रदेशमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केला. योगी आदित्यनाथ यांच्या दौऱ्याबद्दल बोलताना काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी टीका केली होती. “उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्यानंतर ते बॉलिवूडमधील चित्रपट निर्मात्यांशी संवाद साधाण्याची शक्यता आहे. यानंतर बॉलिवूड निर्मात्यांवर जोर-जबरदस्ती करण्याचा प्रयत्न होऊ शकतो,” असा गंभीर आरोप सचिन सावंत यांनी योगी आदित्यनाथांवर केला आहे. तसेच महाराष्ट्राच्या सरकारने असं काही होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी, असे आवाहनही त्यांनी राज्य सरकारला केले होते.
Yogi Aadityanath | यूपीमध्ये फिल्मसिटी बनवण्याचं काम सुरु, योगी आदित्यनाथ#YogiInMumbai #YogiJiInMumbai https://t.co/uoCOPapoFK
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 2, 2020
संबंधित बातम्या :
योगी आदित्यनाथ यांनी फक्त मुंबईशीच पंगा घेतलाय का?; संजय राऊतांचा सवाल
उद्योगांना आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करण्यात काहीच गैर नाही; योगींच्या दौऱ्याची भाजपकडून पाठराखण
अपयशी राज्यातील बेरोजगारी लपवण्यासाठी मुंबईत आलेला ‘ठग’, योगींचे नाव न घेता मनसेची खरमरीत टीका
(Ramdas Athawale on Yogi Adityanath Mumbai visit)