Video : ‘आम्हाला नकोत तुमचे पैसे’ डोंबिवलीतील गायकवाड कुटुंबानं रामदास आठवलेंना खडसावलं

| Updated on: May 19, 2022 | 8:34 AM

Ramdas Athawale Dombivli Video : सात मे रोजी डोंबिवलीच्या संदप गावातील पाच जण खदाणीत बुडाले होते. या घटनेनंतर संपूर्ण डोंबिवलीसह गावांमधील पाणी प्रश्न ऐरणीवर आला होता.

Video : आम्हाला नकोत तुमचे पैसे डोंबिवलीतील गायकवाड कुटुंबानं रामदास आठवलेंना खडसावलं
आठवलेंना सुनावलं!
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

डोंबिवली : डोंबिवलीमध्ये (Dombivli 5 people drown) पाच जणांचा बुडून मृत्यू झाला होता. एकाच कुटुंबातील पाच जणांचा बुडून मृत्यू झाल्यानं सगळ्यांना मोठा धक्का बसला होता. दरम्यान, या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी पोहोचलेल्या रामदास आठवले यांना पीडित कुटुंबाच्या रोषाला सामोरं जावं लागलंय. संदप गावच्या गायकवाड कुटुंबाला भेटण्यासाठी केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athvale) बुधवारी गेले होते. त्यांनी गायकवाड कुटुंबाची भेट घेऊन त्यांना आर्थिक मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला. 50 हजार रुपयांची आर्थिक मदत गायकवाड कुटुंबाला देण्याची घोषणा रामदास आठवले यांनी केली होती. पण गायकवाड कुटुंबानं आठवले यांना खडेबोले सुनावले आणि त्यांना पिटाळून लावलं. दैनिक सामनानं याबाबतचं वृत्त दिलंय. आम्हाला तुमच्या पैशांची गरज नाही, फक्त पाणी द्या, असं टाहो गायकवाड कुटुंबानं फोडला होता. आठवले यांनी आर्थिक मदत देणार असल्याचं सांगताच गायकवाड कुटुंबातील एक व्यक्ती संतापली आणि रागाच्या भरात या व्यक्तीनं रामदास आठवले यांना खडेबोले सुनावलेत.

पाहा व्हिडीओ :

हे सुद्धा वाचा

नेमकं काय सुनावलं?

आठवले साहेब, तुम्ही पैसे काय देताय? आम्ही तुम्हाला देतो… असं वक्तव्य संतापलेल्या व्यक्तीनं केलं. ही अनपेक्षित प्रतिक्रिया पाहून रामदास आठवलेही चपापले होते. यानंतर स्तब्ध झालेल्या रामदास आठवले यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह काढता गायकवाड यांच्या घरातून काढता पाय घेतला. गावातील पाणी प्रश्नाबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली असल्याचंही रामदास आठवले यांनी कुटुंबाला सांगत त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला.

7 मे रोजीची दुर्दैवी घटना

सात मे रोजी डोंबिवलीच्या संदप गावातील पाच जण खदाणीत बुडाले होते. या घटनेनंतर संपूर्ण डोंबिवलीसह गावांमधील पाणी प्रश्न ऐरणीवर आला होता. एकाच घरातील पाच व्यक्ती गायकवाड कुटुंबानं गमावल्यानं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात होती.

दरम्यान, बुधवारी या कुटुंबाची भेट काढण्यासाठी गेले असताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासमोर गायकवाड कुटु्ंबानं टाहो फोडला. या घरात अजूनही दुःखाच वातावरण असून सांत्वन करण्यासाठी गायकवाड कुटुंबाची भेट घ्यायला गेलेल्या आठवलेंना प्रचंड रोशाचा सामना करावा लागला.