मुंबई : ‘शिवसेनेत (Shivsena) आम्ही 52 वर्ष घालवली. तुम्ही भीक दिली असं कसं म्हणू शकतात. आम्ही शिवसेनेसाठी सर्वकाही केलं. उद्धवजी का तुम्ही शरद पवार, सोनिया गांधी यांना सोडत नाहीत,’ असा सवाल करत शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम (Ramdas Kadam) यांना आश्रू अनावर झाले. यावेळी ‘टीव्ही9 मराठी’वर संवाद साधताना त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना अनेक सवाल केले आहेत. यावेळी वारंवार त्यांच्या डोळ्यातून आश्रू येत होते. मागच्या 52 वर्षांत शिवसेनेसाठी केलेल्या प्रत्येक गोष्टींची त्यांनी यावेळी माहिती दिले. तरीही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना एकत्र आणण्यासाठी मी प्रयत्न करणार असल्याचं रामदास कदम यावेळी म्हणालेत. दरम्यान, यावेळी रामदार कदम यांनी आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्यावरही टीकास्त्र सोडलंय. रामदास कदम यांना यावेळी आश्रू अनावर झाले.
शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेनेच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. मागच्या अनेक दिवसांपासून कदम नाराज होते. आज ‘टीव्ही9 मराठी’वर संवाद साधताना त्यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना काही सवाल केलेत. यावेळी त्यांनी शिवसेना कशी तळाला जात आहे, याचंही उदाहरण दिलं. याचवेळी त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनाही सुनावलं. शिंदे गटानं बंडखोरी केल्यानंतर त्यांच्यावर आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी गंभीर टीका केली होती. त्यांच्या टीकेतून वारंवार बंडखोर आमदारांचा अपमानही केला. यावेळी संजय राऊतांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा, अशीही मागणी केली होती. याला प्रत्युत्तर देताना शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनी ‘भीक दिली असं म्हणून नका, असं कदम यावेळी म्हणालेत.
शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनी यावेळी राजीनामा दिल्यानंतर माझी हकालपट्टी केल्याचं सांगत त्यांना राग व्यक्त केला. राजीनामा दिल्यावर हकालपट्टी केली, असं ते दोनदा म्हणत अजून किती जणांना पक्षातून काढणार, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थिती केलाय.
यावेळी कदम यांनी उद्धव ठाकरेंनी त्यांच्या आजुबाजूच्या चौकडीला बाजू करावं, असंही म्हटलंय. यावेळी शिवसेनेचे माजी मंत्री रामदास कदम यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावरही नाव न घेता टीका केलीय.
‘जे आदित्य ठाकरे आधी काका काका करायचे त्यांनीच माझं मंत्रालय घेतलं, असंही कदम यावेळी म्हणालेत. आदित्य ठाकरे मंत्रालयात येऊन बैठका लावायला लावायचे. आम्हीही ठाकरे असल्यानं सहन केलं, असंही कदम म्हणालेत.