“तुझा बाप म्हणून मी…”, रामदास कदम भरसभेत कडाडले

| Updated on: Oct 07, 2024 | 4:44 PM

दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघात रामदास कदम आणि आमदार योगेश कदम हे सातत्याने बैठका, शिवसेनेचे मेळावे आयोजित करत आहेत. यामुळे ते आगामी विधानसभेसाठी जोरदार तयारी करत असल्याचे बोललं जात आहे.

तुझा बाप म्हणून मी…, रामदास कदम भरसभेत कडाडले
Follow us on

Ramdas Kadam on Yogesh Kadam : आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर येऊन ठेपली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. त्यातच आता रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात महाविकासआघाडी विरुद्ध महायुती यांच्यात चांगलीच जुंपली आहे. दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघात रामदास कदम आणि आमदार योगेश कदम हे सातत्याने बैठका, शिवसेनेचे मेळावे आयोजित करत आहेत. यामुळे ते आगामी विधानसभेसाठी जोरदार तयारी करत असल्याचे बोललं जात आहे. त्यातच आता रामदास कदम यांनी एक मोठं वक्तव्य केले आहे.

दापोली खेड मंडणगड विधानसभा मतदारसंघात आमदार योगेश कदम यांनी प्रचारसभा घेतली. या प्रचारसभेवेळी योगेश कदम यांनी जिल्ह्यातील उद्योग प्रस्तावांना निधी मिळवून दिल्याचे सांगितले. केवळ रस्ते, पाखाड्या, पूल, समाजमंदिर बांधणे हीच केवळ आमदाराची जबाबदारी नाही, तर येथे उद्योग आले पाहिजेत रोजगार निर्माण झाले पाहिजेत यासाठी आपण प्रयत्न सुरू केले आहेत. महिलांना ताकद देण्यासाठी महिलांच्या बचत गटांना अगरबत्तीचा कारखाना सुरू करून दिला आहे. बचत गटातील उत्पादित होणाऱ्या मालाला मार्केट मिळावं यासाठीही प्रयत्न सुरू केले आहेत, अशी माहिती योगेश कदम यांनी दिली.

तुझा बाप म्हणून मी नेहमी तुझ्या पाठीशी उभा आहे

सिंधूरत्न योजनेचे अध्यक्ष दीपक केसरकर हे अध्यक्ष आहेत. मात्र, पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आपण जिल्हा नियोजन समितीमधून महिलांकडून आलेल्या या उद्योग प्रस्तावांना निधी मिळवून दिला आहे. यानंतर रामदास कदम यांनी योगेश कदम यांनी केलेल्या कामाचे कौतुक केलं आहे. तुझा बाप म्हणून मी नेहमी तुझ्या पाठीशी उभा आहे, अशा शब्दात रामदास कदम यांनी मुलाचे जाहीर कौतकु केले.

महिलांना आर्थिक सक्षम करणार

मी आयुष्यभर दापोली मतदार संघासाठी काम करणार आहे. माझे एवढे आयुष्य आहे. सर्व धर्म समभाव काय असतो हे संपूर्ण देशभरात पाहायचं असेल तर दापोली मतदार संघात कधीही या आणि पाहा. आम्ही 500 लघु उद्योगाचे प्रस्ताव तयार केले आहेत. कोणत्याही उद्योगाला पैसे कमी पडू देणार नाही. महिलांना आर्थिक सक्षम करणार आहोत. महिलांसाठी उद्योग आणणार आहे, असेही रामदास कदम म्हणाले.