रावसाहेब दानवे हे दादा कोंडके : अनिल गोटे

| Updated on: Jul 05, 2019 | 4:52 PM

धुळे : महापालिका निवडणुकीत धुळ्यामध्ये भाजप विरुद्ध भाजप असा मुकाबला सुरु आहे. भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी भाजपसमोरच आव्हान निर्माण केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाल्यानंतर अनिल गोटे यांची सभा झाली. या सभेत त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा दादा कोंडके म्हणून उल्लेख केला. अनिल गोटे यांनी भाजपमधील सर्वांचाच समाचार घेतला आणि तुमचं सरकार […]

रावसाहेब दानवे हे दादा कोंडके : अनिल गोटे
Follow us on

धुळे : महापालिका निवडणुकीत धुळ्यामध्ये भाजप विरुद्ध भाजप असा मुकाबला सुरु आहे. भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी भाजपसमोरच आव्हान निर्माण केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा झाल्यानंतर अनिल गोटे यांची सभा झाली. या सभेत त्यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा दादा कोंडके म्हणून उल्लेख केला.

अनिल गोटे यांनी भाजपमधील सर्वांचाच समाचार घेतला आणि तुमचं सरकार मी वाचवलंय हे विसरु नका, असा टोलाही लगावला. केंद्रीय संरक्षण राज्य मंत्री सुभाष भामरे हे सुपारी घेऊन अधिकाऱ्यांच्या बदल्या करतात, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

सुभाष भामरे ते गिरीश महाजन, अनिल गोटे कुणावरही बोलायला विसरले नाही. मंत्री गिरीश महाजन यांना गोटेंनी अपभ्रंश करुन ग्रीस संबोधलं. ज्याप्रमाणे सुरेश जैनचं पार्सल आम्ही परत पाठवलं, तसंच जामनेरच्या ग्रीसचं भरीत करुन परत पाठवू, असं गोटे म्हणाले.

दरम्यान, यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही सभा झाली. ज्यात त्यांनी धुळे महापालिका भ्रष्टाचाराचं केंद्र बनली असल्याचं म्हटलं. शिवाय धुळ्याच्या विकासासाठी भाजपला सत्ता देण्याचं आवाहन केलं. गिरीश महाजन यांच्यासह अनेक मंत्री या सभेला उपस्थित होते.

धुळे आणि अहमदनगर महापालिकेसाठी 9 डिसेंबरला मतदान होणार आहे, तर 10 डिसेंबरला निकाल आहे. यासाठी सध्या दोन्ही शहरात जोरदार प्रचार चालू आहे.

संबंधित बातम्या :

शिवसेना आणि अनिल गोटे मिळून धुळ्यात भाजपला रोखणार?

मला ठार मारण्याचा अमोल चौधरींचा कट : अनिल गोटे

अनिल गोटे भाजपमधील एक गट फोडून स्वतः नेतृत्त्व करणार

या दोन अटींवर आमदार अनिल गोटेंचा राजीनामा मागे