मुंबई : “भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या त्यांची छाती फाडण्याची गरज (Saamana Editorial On Chandrakant Patil) नाही. त्यांच्या छातीत हिंदुत्वाच्या बाबतीत किती काळेकुट्ट विष ठासून भरले आहे. याचा अनुभव 100 दिवसांपूर्वी महाराष्ट्राने घेतला,” अशी खोचक टीका ‘सामना’च्या अग्रलेखातून चंद्रकांत पाटलांवर करण्यात आली आहे. विशेष म्हणजे अग्रलेखात चंद्रकांत पाटलांचा उल्लेख चांदमियां पाटील असा करण्यात आला आहे.
“प्रदेश भाजपचे अध्यक्ष चांदमियां पाटील यांच्या छातीची तातडीने तपासणी (Saamana Editorial On Chandrakant Patil) करण्यात यावी. ते म्हणाले, ‘‘माझी छाती फाडली तर त्यात श्रीराम दिसतील.’’ चांदमियांनी त्यांची छाती फाडण्याची गरज नाही. त्यांच्या छातीत हिंदुत्वाच्या बाबतीत किती काळेकुट्ट विष ठासून भरले आहे याचा अनुभव शंभर दिवसांपूर्वी महाराष्ट्राने घेतला आहे. राम समजायला सत्यवचन व माणुसकी समजून घ्यावी लागते. राज्यातील विरोधकांकडे त्याची वानवा आहे. म्हणूनच ‘ठाकरे सरकार’च्या अयोध्यावारीवर ते छात्या बडवीत आहेत. तुमच्या छातीत खरंच राम असेल तर छात्या बडवणे बंद करा. श्रीरामाला त्रास होईल,” असा सल्लाही सामनाच्या अग्रलेखातून चंद्रकांत पाटील यांना देण्यात आला आहे.
रश्मी ठाकरे दैनिक सामनाच्या संपादक, सामनाच्या पहिल्या महिला संपादक
मिसेस मुख्यमंत्री अर्थात रश्मी ठाकरे यांनी ‘सामना’च्या संपादकपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर त्यांनी पहिल्याच अग्रलेखात भाजपवर हल्लाबोल चढवला होता. भाजपाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा ‘भाजपचे दादामियां’ असा उल्लेख करत दादामियां ‘इतिहास पुरुष’ कधीपासून झाले? असा सवाल ‘सामना’तून विचारला होता. यानंतर पुन्हा एकदा रश्मी ठाकरेंनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली आहे.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अयोध्या यात्रा यथासांग पार पडली. त्यामुळे महाराष्ट्रातील उठवळ विरोधकांचे पोटविकार बळावल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यांनी ठाकरे सरकारच्या अयोध्या यात्रेवर टीका-टिप्पणी सुरु केली. त्यात त्यांचेच तोंडात लपवलेले राक्षसी सुळे जनतेला दिसत आहेत. उद्धव ठाकरे हे अयोध्येस गेले, ते तिथे प्रथम गेले काय? राज्यात फडणवीसांचे आणि केंद्रात पंतप्रधान मोदींचे सरकार असताना उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचा मोठा फौजफाटा घेऊन अयोध्येस जाऊन आले. दर्शन घेतले होते तसेच शरयूच्या तीरी त्यावेळी भव्य महाआरती केली होती. तोपर्यंत ठाकरे हे हिंदुत्ववादी होते,” असा टोलाही सामनातून लगावण्यात आला आहे.
“आता राज्याचे मुख्यमंत्री म्हणून ते अयोध्येस गेले. तिथे सरकारी मानवंदना स्वीकारली. म्हणजे त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. मुख्यमंत्र्यांसह त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि हजारो शिवसैनिकांसह रामलल्लांचे दर्शन घेतले. मात्र आता महाराष्ट्रातील भाजपवाल्यांना हे ढोंग वाटत आहे. शिवसेनेचे हिंदुत्व एखाद्याला ढोंग वाटणे हेच खरं तर ढोंग आहे. तसेच ढोंग राज्यातील भाजपवाले करती आहे. उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीबरोबर सरकार स्थापन केले. सरकारमधील पक्षांच्या विचारधारा वेगळ्या असतीलही, पण लोकांना अन्न, वस्त्र, निवारा देणे, सगळ्यांना समान न्याय देणे हा मानवता धर्म म्हणजेच राजधर्म आहे,” असेही सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
रश्मी ठाकरेंच्या पहिल्याच ‘सामना’ अग्रलेखात भाजपवर हल्लाबोल
“उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाला पूर्वीइतकेच घट्ट पकडून आहेत. काँग्रेसच्या सोबत राहूनही त्यांनी हिंदुत्वाच्या दुधात मिठाचा खडा पडू दिला नाही याच पोटदुखीने राज्यातील विरोधक बेजार झाले आहेत. दिल्लीप्रमाणे नागरिकता कायद्यावर महाराष्ट्रात हिंसा व्हावी असे राज्यातील ठाकरे विरोधकांना वाटत होते. पण उद्धव ठाकरे यांनी विरोधकांच्या पोटदुखीवर असा इलाज केला की, राज्यात साधी ठिणगीही पडू दिली नाही,” अशी टीकाही सामनातून करण्यात आली (Saamana Editorial On Chandrakant Patil) आहे.