Marathi News Politics Ratnagiri nagarparishad Election Minister Uday Samant started Election plan
रत्नागिरी नगर परिषदेची प्रतिष्ठेची निवडणूक, मंत्री उदय सामंतांकडून आतापासूनच तयारी सुरु
रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीचे पडघम आत्तापासून वाजू लागले आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या रत्नागिरी जिल्ह्याचे हेडक्वार्टर म्हणून रत्नागिरी नगरपरिषदेची ओळख आहे. आणि याच नगरपरिषदेवर पुन्हा एकदा शिवसेनेचा झेंडा फडकवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचे धरतीवरती शिवसेना बॅनर बाजी सुरू झालीय.