मुंबई : संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडी कडून अटक झाल्यानंतर राजकीय वातावरण तापला आहे. यातच अपक्ष आमदार रवी राणा यांनी संजय राऊतवर सडकून टीका केली आहे. गेल्या वर्षभरापासून ईडी निष्पक्षपणे चौकशी करत आहे. अनेकदा संजय राऊत यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आलं. पण राऊतांनी टाळाटाळ केली. संजय राऊत यांनी आर्थिक अफरातफर केली आहे. त्याचे धागेदोरे लांबपर्यंत जात आहेत. ते अनिल परबांपर्यंत पोहोचतील आणि त्यांना सुद्धा जेलमध्ये जावं लागेल. याशिवाय महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात आणण्याची मोठी जबाबदारी संजय राऊतांवर होती. उद्धव ठाकरेंनी भाजपला बाजूला सारत काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत युती केली. त्यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं, यामागे सुद्धा संजय राऊत होते, पण आता सारं बदललं आहे. राऊत जेलमध्ये गेलेत. हळूहळू एकएकाचा नंबर लागेल. राऊतांनंतर आता अनिल परबांचा नंबर आहे, तेही जेलमध्ये जातील, असं रवी राणा (Ravi Rana) म्हणाले आहेत.
संजय राऊत यांना ईडी कडून अटक झाल्यानंतर राजकीय वातावरण तापला आहे. यातच अपक्ष आमदार रवी राणा यांनी संजय राऊतवर सडकून टीका केली आहे. गेल्या वर्षभरापासून ईडी निष्पक्षपणे चौकशी करत आहे. अनेकदा संजय राऊत यांना जबाब नोंदवण्यासाठी बोलवण्यात आलं. पण राऊतांनी टाळाटाळ केली. संजय राऊत यांनी आर्थिक अफरातफर केली आहे. त्याचे धागेदोरे लांबपर्यंत जात आहेत. ते अनिल परबांपर्यंत पोहोचतील आणि त्यांना सुद्धा जेलमध्ये जावं लागेल, असं रवी राणा म्हणाले आहेत.
मुंबईतील गोरेगाव येथील पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी अखेर संजय राऊतांना सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीकडून अटक झाली आहे. काल दिवसभराच्या मारेथॉन चौकशी नंतर मध्यरात्री ईडीने संजय राऊतांना अटक केलेय. रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास ईडीच्या पथकाने संजय राऊतांच्या विक्रोळी येथील निवासस्थानी धाड टाकली. तब्बल नऊ तासांच्या चौकशीनंतर सायंकाळी ईडीने राऊतांना ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना ईडीच्या कार्यालयात आणण्यात आले. तिथे त्यांची पुन्हा चौकशी करण्यात आली. यानंतर साडेबाराच्या सुमारास ईडीने त्यांना अटक केल्याची घोषणा केली.