मुंबई : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांना धक्का बसला आहे. राजू शेट्टींचा खंदा समर्थक आणि स्वाभिमानीची बुलंद तोफ रवीकांत तुपकर (Ravikant Tupkar resigns ) यांनी राजीनामा दिला आहे. रवीकांत तुपकर (Ravikant Tupkar resigns) हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. त्यांनी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचीही भेट घेतली. त्यामुळे रवीकांत तुपकर येत्या काही दिवसात भाजपमध्ये दिसले तर नवल वाटू नये.
राजीनामा राजू शेट्टींना सादर
रवीकांत तुपकर यांनी आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा तसंच सदस्यत्वाचा राजीनामा राजू शेट्टी यांना पाठवला आहे. “मी गेल्या अनेक वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक सक्रीय कार्यकर्ता म्हणून कार्यरत होतो. माझ्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी होती. पण आज प्रदेशाध्यक्षपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, तो मंजुर करावा” असं रवीकांत तुपकर यांनी म्हटलं आहे.
राजू शेट्टी यांची प्रतिक्रिया
दरम्यान, रवीकांत तुपकर यांचा राजीनामा अद्याप मला प्राप्त झालेला नाही. तो माझ्याकडे आल्यानंतर मी माझी प्रतिक्रिया व्यक्त करेन, असं राजू शेट्टी म्हणाले.
सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया
रवीकांत तुपकर मेहनती आहेत आणि त्यांनी मोठं काम केलं आहे. स्वाभिमानी पक्षाने त्यांना आश्वासन दिलं होतं, ते पूर्ण केलं नाही. त्यामुळे ते नाराज आहेत. माझी आणि त्यांची 2 ते 3 वेळा भेटी झाल्या. मात्र त्यामध्ये पक्ष प्रवेशाबाबत चर्चा नाही, असं सदाभाऊ खोत म्हणाले.
कोण आहेत रवीकांत तुपकर?