मुंबई : ‘स्वाभिमानी शेतकरी संघटने’ला रामराम ठोकणारे, राजू शेट्टींचे खंदे समर्थक रविकांत तुपकर यांची पक्षात घरवापसी होण्याची चिन्हं आहेत. अवघ्या वीस दिवसांतच ‘सुबह का भुला’ स्वगृही परतण्याची शक्यता (Ravikant Tupkar to return to Swabhimani) आहे. कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन तुपकर आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर तुपकरांनी राजीनामा दिल्यामुळे राजू शेट्टींना मोठा धक्का बसला होता. रवीकांत तुपकर भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा होती. परंतु एके काळचे सहकारी आणि ‘रयत क्रांती संघटने’च्या सदाभाऊ खोत यांच्याशी त्यांनी संधान बांधलं होतं. मात्र आता तुपकर राजीनामा फाडून पुन्हा ‘स्वाभिमानी’चा झेंडा हाती घेणार असल्याची माहिती आहे.
राजीनाम्यात काय लिहिलं होतं?
‘मी गेल्या अनेक वर्षांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक सक्रीय कार्यकर्ता म्हणून कार्यरत होतो. माझ्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी होती. पण आज प्रदेशाध्यक्षपदाचा आणि सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे, तो मंजूर करावा” असं रवीकांत तुपकर यांनी म्हटलं राजीनाम्यात म्हटलं होतं.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तुपकरांना दिलेलं आश्वासन पूर्ण न केल्यामुळे ते नाराज होते. याच नाराजीतून आणि अंतर्गत राजकारणाला कंटाळून त्यांनी राजीनामा देत भाजपची वाट धरल्याची चर्चा होती.
स्वाभिमानीची बुलंद तोफ, राजू शेट्टींचा खंदा समर्थक, प्रदेशाध्यक्ष रवीकांत तुपकरांचा राजीनामा!
बुलडाण्यातील चिखली मतदारसंघातून ते निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं जात होतं. परंतु ‘कमळ’ चिन्हावर निवडणूक लढवण्याची अट तुपकरांना घालण्यात आली होती. भाजपच्या दारावर थाप देऊन आलेले तुपकर यूटर्न घेत ‘स्वाभिमानी’त गृहप्रवेश (Ravikant Tupkar to return to Swabhimani) करणार आहेत.
कोण आहेत रवीकांत तुपकर?