Supriya Sule : सरकार विमानातं फिरतंय, हॉटेलात बसतंय अन् अडीच हजाराची दाढी कटींग करतंय, सुप्रिया सुळेंच्या अनोख्या शुभेच्छा..!

| Updated on: Jul 10, 2022 | 2:21 PM

राजकारणाची पातळी खालावली आहे. केवळ राजकीय स्वार्थासाठी आमदारांचे बंड होते हे आता वेगळे सांगायची गरज राहिलेली नाही. यामुळे त्यांचे स्वार्थ साधले जात असले तरी सर्वसामान्य जनता मात्र भरडली जात आहे. जनतेचे नुकसान तर होत आहे पण लोकप्रतिनीधीवर विश्वास ठेवेल तरी कोण अशी स्थिती या आमदारांच्या भूमिकेमुळे झाली असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.

Supriya Sule : सरकार विमानातं फिरतंय, हॉटेलात बसतंय अन् अडीच हजाराची दाढी कटींग करतंय, सुप्रिया सुळेंच्या अनोख्या शुभेच्छा..!
supriya sule ncp
Image Credit source: tv9
Follow us on

पुणे : एकीकडे (Eknath Shinde) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे 24 तास जनतेसाठी उपलब्ध असल्याचे सांगत असले तरी विरोधक हे सरकार किती असंवेदनशील आहे हे जनतेच्या लक्षात आणून देत आहे. (Supriya Sule) खा. सुप्रिया सुळे यांनी तर अनोख्या पध्दतीनेच सरकारची कार्यपध्दती सांगितली. हे सरकार विमानातं फिरतंय, हॉटेलात बसतंय अन् अडीच हजाराची दाढी कटींग करतंय असे म्हणत त्यांनी उपरोधिक टोला लगावला आहे. (Rebel MLA) बंडखोरीच्या दरम्यान या सरकारचे कारनामे ही जनता विसरणार नाही. आता जरी हे जनतेचे सेवक असल्याचे सांगत असले तरी त्यांचा स्वार्थ हा काही लपून राहिलेला नाही. पण तेच आता विठ्ठलाचा आशिर्वाद घेण्यासाठी आल्याचे म्हणत सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच टार्गेट केले आहे. सरकार हे अस्थिर आहे पण खरे रुप लपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

शिवसेनेला कायम साथ, बाळासाहेबांनीच ठरवला उत्तराधिकारी

महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना हा एक मित्रपक्ष झाला आहे. त्यामुळे शिवसेनेला साथ दिली आहे आणि भविष्यातही सेनेबरोबरच राहणार आहोत. आता ज्या नेतृत्वाला जबाबदार धरुन हे आमदार बंड करीत आहेत त्याच उद्धव ठाकरे यांना खुद्द बाळासाहेबांनी शिवसेनेचा उत्तराधिकारी ठरवले होते. आता त्यांनाच दुखावणे म्हणजेच बाळासाहेब ठाकरे यांना दुखवलवल्यासारखे असल्याचेही सुळे म्हणाल्या. सरकारकडून जे भासवण्याचा प्रयत्न केला जात आहे तसे प्रत्यक्षात नसल्याने हे सरकार कधीही अस्थिर होऊ शकते. शिवाय सर्वसामान्य जनतेला घेऊन केवळ घोषणांचा पाऊस आहे प्रत्यक्षात अंमलबजावणी झाल्यावरच खरे रुप समोर येणार असल्याचेही त्या म्हणाल्या.

सर्वसामान्य जनतेचे नुकसान

राजकारणाची पातळी खालावली आहे. केवळ राजकीय स्वार्थासाठी आमदारांचे बंड होते हे आता वेगळे सांगायची गरज राहिलेली नाही. यामुळे त्यांचे स्वार्थ साधले जात असले तरी सर्वसामान्य जनता मात्र भरडली जात आहे. जनतेचे नुकसान तर होत आहे पण लोकप्रतिनीधीवर विश्वास ठेवेल तरी कोण अशी स्थिती या आमदारांच्या भूमिकेमुळे झाली असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे. यांचा प्रवास एका विमानातून दुसऱ्या विमानात, राहयाचे फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये आणि दाढी-कठीणला हजारो रुपये मोजणाऱ्यांना सर्वसामान्यांच्या वेदना काय समजणार असा टोलाही त्यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा

हे तर आमदारांचे दुर्देवच

एखाद्या पक्षाच्या चिन्हावर निवडुण यायचे आणि पुन्हा पक्षा विरोधातच भूमिका घ्यायची ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. या आमदारांनी तर सत्तेसाठी कायपण अशीच भूमिका घेतली होती. महाराष्ट्रातील आमदरांना राज्याबाहेरील पोलीस हताळत होते. सुरत, गुवाहाटी,गोवा फिरून भारतदर्शन करून आता जनसेवेचा वसा घेतल्याचे ते भासवित आहेत. त्यामुळे हे सुरवातीला चांगले असले तरी या सरकारचे भवितव्य अस्थिर असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.