मनसेच्या (MNS) नावाने बनावट पावती बुक बनवून फेरीवाल्यांकडून पैसे उकळणाऱ्या दोन भामट्यांना मनसेच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडले आहे. हा प्रकार नुकताच विरारमध्ये (VIRAR) उघडकीस आला आहे. मनसेच्या कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतलेल्या भामट्यांकडे शिवसेनेच (SHIVSENA) सभासद नोंदणी कार्ड देखील सापडलं आहे. मनसेनी भामट्यांना समज देऊन सोडून दिलं असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मात्र या घटनेमुळे विरारमध्ये मनसे आणि शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. ज्यावेळी मनसेच्या नावाने पैसे उकळले जात असल्याची माहिती मनसेच्या कार्यकर्त्यांना लागली. त्यावेळी त्यांनी पाळत ठेऊन त्या दोघांना पकडले. चौकशी केली असता त्यांच्या खिशात शिवसेनेचं कार्ड सापडलं आहे. त्यावेळी तिथं उपस्थित कार्यकर्त्यांनी दोघांनाही समज दिली आहे.
मनसेच्या नावाने शिवजयंतीची वर्गणी गोळा केली
शिवसेनेचा कार्यकर्ता मनसेच्या नावाने पावती बुक बनवून वर्गणी गोळा करत असल्याचा भांडाफोड मनसेच्या प्रफुल जाधव यांनी केला आहे. दोघांना विरार पूर्व मनवेलपाडा, कारगील नगर परिसरात मनसेच्या कार्यकर्त्यांनी पैसे घेत असताना पकडले होते. चार दिवसांपुर्वी मार्केटमध्ये दोन भामटे मनसेच्या नावाने शिव जयंतीची वर्गणी गोळी करीत असल्याचे मनसेचे पदाधिकारी प्रफुल्ल जाधव यांना समजले. त्यावेळी जाधव यांनी परिसर गाठला. तिथं गेल्यानंतर चौकशी केली असता, दोघेही मनसेचे कार्यकर्ते नसल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्या हातात शिवजयंतीचं पावती बुक होतं. तिथं उपस्थित अनेकांची त्यांची कसून चौकशी केली असता, ते नालासोपारा परिसरातील रहिवासी असल्याचे उघडकीस आले. त्यातील एकाच्या खिशात शिवसेनेचं सभासद नोंदणी कार्ड सापडलं. त्यामुळे जाधव यांनी पक्षात कट्टर रहा, कोणत्याही पक्षाला बदनाम करु नका असा सल्ला देवून, दोघांना सोडून दिलं.
मनसे बदनामी करीत असल्याचा शिवसेनेचा आरोप
मनसेचे पावती फाडणारे आमचे कार्यकर्ते नसल्याचं शिवसेनेने स्पष्ट केलं आहे. ते दोघेही भामटे होते. त्यामुळेचं ते मनसेच्या नावाने पैसे उकळत होते. मनसेनं त्यावेळीचं त्यांना पोलिसांच्या स्वाधिन केलं पाहिजे होतं. त्यामध्ये ते कोण होते हे स्पष्ट झालं असंत. माञ मनसे सेनेची बदनामी करत असल्याचा आरोप शिवसेने केला आहे.