कोकणात होणाऱ्या रिफायनरी प्रकल्पाला काही लोकांचा विरोध आहे. तर काहींचं समर्थन आहे. या प्रकल्पाला नरेंद्र जोशी यांचा कडाडून विरोध आहे. रिफायनरी प्रकल्पाचे विरोधक नरेंद्र जोशी (Narendra Joshi) यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना धमकी दिली आहे. “रिफायनरी प्रकल्प झाला तर उदय सामंत (Uday Samant) यांना जाळून टाकू”, असं म्हणत नरेंद्र जोशी यांनी उदय सामंत यांना धमकी दिलीय. या प्रकरणी उदय सामंत तक्रार करणार असल्याची माहिती आहे.