मुंबई: राज्य सरकारने दहावी व बारावीच्या परीक्षा अर्जांमधून हिंदू शब्द वगळला. त्यामुळे आता ठाकरे सरकारला हिंदू शब्दाचेही वावडे वाटू लागले आहे, अशी टीका भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी केली. (BJP leader Atul Bhatkhalkar takes a dig at Shiv Sena)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावीच्या परीक्षा फॉर्ममध्ये धर्माच्या रकान्यातून हिंदू शब्द वगळून अल्पसंख्याकेत्तर (नॉन-मायनॉरिटी) असा उल्लेख केला आहे. मंदिरे सुरु करण्यासाठी तब्बल सहा महिने उशीर करणे, आषाढी वारीसाठी दिलेल्या बससाठी भाडे आकारणे, हिंदूंच्या साधूंचे हत्याकांड होऊनही आरोपींच्या विरोधात कडक कारवाई न करने आणि आता चक्क हिंदू शब्दच वगळणे यातून ठाकरे सरकार ‘काहींना’ खुश करण्यासाठी आणि आपली मतपेटी सांभाळण्यासाठी सतत हिंदू विरोधी निर्णय घेत आहे, असा आरोप अतुल भातखळकर यांनी केला.
याप्रकरणी अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना पत्र लिहून तीव्र निषेध व्यक्त केला. 24 तासांत हा फॉर्म मागे घेऊन त्यात हिंदू धर्माचा उल्लेख न केल्यास भारतीय जनता पक्षाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही भातखळकर यांच्याकडून देण्यात आला.
शिवसेनेचे दक्षिण मुंबईचे विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांनी अजान पठण स्पर्धेची घोषणा केली होती. अजानमुळे मन:शांती मिळते. त्यामुळे अजानची गोडी लहान मुलांना लागवी, यासाठी या स्पर्धेचे आयोजन केल्याचे पांडुरंग सपकाळ यांनी म्हटले होते.
यानंतर भाजपचे नेते चांगलेच आक्रमक झाले होते. सत्तेसाठी शिवसेनेचे स्वरूप बदलत आहे. शिवसेनाप्रमुख प्रत्येक धर्म प्यारा असे बोलले असतील, परंतु त्यांची पालखी उचला, असे ते कधी बोलले नाहीत, अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली होती.
संबंधित बातम्या:
गीता पठणात मुस्लिम मुलीचा प्रथम क्रमांक, कला-स्पर्धा-अभिनयाला धर्माचा रंग देऊ नका : नवाब मलिक
शिवसेनेने आता फक्त हिरवा झेंडाच खांद्यावर घेणं बाकी आहे; भाजपची खोचक टीका
बाबरीचे ढाचे कोसळताच बगला वर केलेल्यांची हिंदुत्वाची पोपटपंची हा विनोदच, शिवसेनेचं टीकास्त्र
(BJP leader Atul Bhatkhalkar takes a dig at Shiv Sena)