कोल्हापूर शिवसेना पदाधिकांऱ्यामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, गाऱ्हाणं थेट उद्धव ठाकरेंच्या कानावर

| Updated on: Dec 13, 2020 | 9:48 AM

कोल्हापूर शिवसेना पदाधिकांऱ्यामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. जिल्हा प्रमुख संजय पवार यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी केली आहे.

कोल्हापूर शिवसेना पदाधिकांऱ्यामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर, गाऱ्हाणं थेट उद्धव ठाकरेंच्या कानावर
Follow us on

कोल्हापूर :  कोल्हापूर शिवसेना पदाधिकांऱ्यामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. जिल्हा प्रमुख संजय पवार यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी शहर प्रमुख रविकिरण इंगवले यांनी केली आहे. कोल्हापूर शिवसेना जिल्हाप्रमुख आणि शहर प्रमुख यांच्यात गेले काही दिवस वाकयुद्ध सुरु आहे. (Remove Sanjay Pawar from ShivSena Ravikiran Ingwale Demand)

जिल्हा प्रमुख संजय पवार यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची मागणी शहर कार्यकारणीच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याचं रवीकिरण इंगवले यांनी सांगितलं आहे. पक्षातून हकालपट्टी केलेल्या लोकांना घेऊन संजय पवार कार्यक्रम करत असल्याचा आरोप इंगवले यांनी केला आहे.

दुसरीकडे इंगवले यांच्या आरोपांना उत्तर देताना संजय पवार यांनी इंगवलेंवर जोरदार टीका केलीये. संजय पवार स्वतःला पक्षप्रमुखापेक्षा मोठे समजत आहेत. दुसऱ्या पक्षात असताना शिवसेनाप्रमुखांची प्रतिमा जळणाऱ्यांनी आम्हाला पक्ष निष्ठा शिकवू नये, असं प्रत्युत्तर संजय पवार यांनी इंगवले यांना दिलं आहे.

रवीकिरण इंगवले आणि संजय पवार याआधीही अनेकदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. अनेकदा त्यांच्यात विविध विषयांवरुन शाब्दिक फैरी झडल्या आहेत.  माजी राजेश क्षिरसागर विरुद्ध संजय पवार असा गट आहे. कोल्हापुरात या गटामध्ये जोरदार वाद आहेत. संजय पवार यांनी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवाराला मदत केल्याचा आरोप आहे. त्यावेळीही इंगवले गटाने कारवाई करण्याची मागणी केली होती. (Remove Sanjay Pawar from ShivSena Ravikiran Ingwale Demand)

हे ही वाचा

महिलांच्या सबलीकरणात शरद पवारांचं मोठं योगदान; रोहित पवारांची स्तुतिसुमनं

शरद पवार आता फुले, शाहू, आंबेडकरांच्या पंक्तीत विराजमान- जयंत पाटील