पणजी : देशातील पहिला निकाल गोव्यात लागला आहे. देशातील पहिला निकाल गोव्यात लागला आहे. गोव्यात लोकसभेच्या 2 जागा आहेत. या दोन्ही मतदारसंघामध्ये चांगलीच चुरशीची लढत पाहायला मिळाली. अखेर दोन्ही जागांचा निकाल घोषित करण्यात आला. या 2 जागांपैकी एक जागेवर काँग्रेस आणि एक जागा भाजपला मिळाली आहे.
दक्षिण गोव्यात काँग्रेसचे फ्रन्सिस्को सार्दीन 3 हजार 847 मतांनी विजयी झाले आहेत. सार्दीन यांना 25 हजार 358 मते, तर भाजपचे नरेंद्र सवाईकर यांना 21 हजार 511 मते मिळाली.
उत्तर गोव्यात भाजपचे केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांनी 10 हजार 68 मतांनी विजय मिळवला आहे. नाईक यांना 28 हजार 333 मते तर पराभूत काँग्रेस उमेदवार गिरीश चोडनकर यांना 18 हजार 265 मते मिळाली.