तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून रेवंत रेड्डी यांनी शपथ घेतली, मंत्री मंडळात कोण-कोण सहभागी पाहा

| Updated on: Dec 07, 2023 | 2:30 PM

तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून अखेर रेवंत रेड्डी यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली आहे. चंद्रशेखर राव हे सलग दोन वेळा मुख्यमंत्री झाल्यानंतर आता रेवंत रेड्डी या राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत. या शपथविधी सोहळ्याला सोनिया, राहुल आणि प्रियंका गांधी जातीने हजर होते.

तेलंगणाचे मुख्यमंत्री म्हणून रेवंत रेड्डी यांनी शपथ घेतली, मंत्री मंडळात कोण-कोण सहभागी पाहा
revanth reddy
Image Credit source: TV9MARATHI
Follow us on

तेलंगणा | 7 डिसेंबर 2023 : पाच राज्यातील विधानसभा निवडणूकात कॉंग्रेसला एकमेव विजय देणाऱ्या तेलंगणात अखेर कॉंग्रेसच्या रेवंत रेड्डी यांचे सरकार स्थापन झाले आहे. रेवंत रेड्डी यांनी आज मुख्यमंत्री पदाची शपथ केली आहे. मुख्यमंत्री यांच्या सह एकूण 12 मंत्र्यांनी शपथ केली आहे. मल्लू भट्टी विक्रमार्क यांना उपमुख्यमंत्री तर गद्दम प्रसाद कुमार यांना विधानसभा अध्यक्ष बनविले आहे. शपथग्रहण समारंभाला कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह कॉंग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते.

कॉंग्रेस नेते रेवंत रेड्डी तेलंगणाचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत. हैदराबादच्या एलबी स्टेडियममध्ये आयोजित भव्य समारंभात तेलंगणाचे राज्यपाल टी सौंदरराजन यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. यावेळी कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या, उपमुख्यमंत्री डी. शिवकुमार यांच्यासह अनेक मोठे नेते हजर होते.

रेवंत रेड्डी हे तेलंगणा प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष पद सांभाळत होते. ते तेलंगणाचे दुसरे मुख्यमंत्री बनले आहेत. साल 2013 मध्ये तेलंगणाच्या स्थापणेनंतर कॉंग्रेस येथे प्रथमच सत्तेत आली आहे. येथे आतापर्यंत चंद्रशेखर राव ( केसीआर ) दोन वेळा मुख्यमंत्री बनले होते. यंदा त्यांची हॅट्रीक चुकली आहे.

येथे ट्वीट पाहा –

सोनिया यांच्या सोबत व्यासपीठावर आले

56 वर्षीय रेवंत रेड्डी यांनी एलबी स्टेडीयममध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यात कॉंग्रेसच्या सोनिया गांधी यांच्या सोबत रेवंत रेड्डी यांनी व्यासपीठावर आगमन केले. या शपथविधी सोहळ्याला एक लाख लोक उपस्थित होते. शपथ घेण्यापूर्वी रेवंत रेड्डी खुल्या जीपमधून सोनिया गांधी यांनी घेऊन सोहळ्यात पोहचले.

या आमदारांनी घेतली मंत्री पदाची शपथ –

दामोदर राजनरसिंह,

उत्तम कुमार रेड्डी,

भट्टी विक्रमार्क,

कोमाटी रेड्डी वेंकट रेड्डी,

सीताक्का,

पोन्नम प्रभाकर,

श्रीधर बाबू,

तुम्मला नागेश्वर राव,

कोंडा सुरेखा,

जुपल्ली कृष्णा पोंगुलेटी.

कॉंग्रेसला मोठा विजय

तेलंगणातील विधानसभा निवडणूकीत कॉंग्रेसला मोठा विजय मिळाला असून 119 पैकी 64 जागांवर आमदार निवडून आले आहेत. तर बीआरएसला 39 आणि भाजपाला 8 जागा मिळाल्या आहेत. कर्नाटक नंतर दक्षिणेतील तेलंगणा कॉंग्रेसची सत्ता असलेले दुसरे राज्य बनले आहे. तर तामिळनाडूत डीएमके सोबत कॉंग्रेसचे सरकार आहे. तेलंगणातील विजयाचे श्रेय रेवंत रेड्डी यांनाच सुरुवातीपासून मिळाले आहे. त्यांनाच मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. मंगळवारी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली.

कोण आहेत रेवंत रेड्डी  ?

रेवंत रेड्डी यांचा जन्म 1969 मध्ये आंध्रप्रदेशातील महबूबनगरात झाला. त्यांनी विद्यार्थी संघटना अभाविपमधून राजकारणाची सुरुवात केली. नंतर ते चंद्राबाबू नायडू यांच्या तेलगू देशममध्ये गेले. 2009 मध्ये आंध्रप्रदेशातीस कोडांगल येथून ते टीडीपीच्या तिकिटावर आमदार म्हणून निवडून आले. साल 2014 मध्ये ते टीडीपीचे विधीमंडळ नेते म्हणून निवडले गेले. 2017 मध्ये रेवंत रेड्डी कॉंग्रेसमध्ये सामील झाले. परंतू साल 2018 मध्ये ते विधानसभेची निवडणूक हारले. तरीही त्यांच्यावर विश्वास दाखवित त्यांना 2019 मध्ये लोकसभा निवडणूकीचे मलकाजगिरी येथून तिकीट देण्यात आले. त्यात ते विजयी झाले. नंतर 2021 मध्ये कॉंग्रेसने त्यांना मोठी जबाबदारी देत प्रदेशअध्यक्ष केले.