‘त्या’ व्हायरल ऑडिओ क्लिपवर ऋतुजा लटके यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या…

| Updated on: Oct 20, 2022 | 2:57 PM

मुरजी पटेल यांनी अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीतून माघारी घेतल्यानंतर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपवर ऋतुजा लटके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

त्या व्हायरल ऑडिओ क्लिपवर ऋतुजा लटके यांची पहिली प्रतिक्रिया म्हणाल्या...
Follow us on

मुंबई :  अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणूक सुरुवातीपासूनच चर्चेत राहिली आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना (Shiv sena) उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके (Rituja Latke) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून (BJP) मुरजी पटेल यांना उमेदवारी देण्यात आली होती. भाजपाने आता या निवडणुकीतून माघार घेतली आहे. मात्र मुरजी पटेल यांच्या माघारीनंतर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ज्या ऑडिओ क्लिपमध्ये अंधेरी पूर्व विधानसभा निवडणुकीत नोटाला मतदान करण्याचे आव्हान केले जात आहे. या ऑडिओ क्लिपमधील आवाज हा  मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्याचा असल्याचा दावा केला जात आहे. याबाबत ऋतुजा लटके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

नेमकं काय म्हटलं लटके यांनी?

भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांनी माघारी घेतल्यानंतर एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये असं म्हटलं आहे की, ‘ इस चुनाव मे काका नही, कमल का फूल नही लेकीन नोटा का बटन है’ या बाबत ऋतुजा लटके यांना विचारले असता. प्रत्येक जण निवडणूक जिंकण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.  मात्र या ऑडिओ क्लिपमुळे पुन्हा एकदा ही निवडणूक चर्चेत आली आहे.

हे सुद्धा वाचा

अपक्ष उमेदवाराचा खळबळजनक दावा

दरम्यान दुसरीकडे अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीचे अपक्ष उमेदवार  मिलिंद कांबळे हे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी वर्षावर गेले होते. मात्र त्यांच्याकडे अपॉईंटमेंट नसल्याने त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटता आले नाही.  उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आपल्यावर 20 ते 25 जणांच्या गटाने दबाव आणल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने खळबळ उडाली आहे.