Rohit Pawar : आगामी महापालिका निवडणुकीत विजयाची हंडी फोडण्यासाठीच गोविंदा आरक्षणाचा निर्णय, रोहित पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला

| Updated on: Aug 20, 2022 | 1:13 PM

गोविंदांना आरक्षण जाहीर केल्याच्या निर्णयानंतर आता इतर खेळ खेळणारे खेळाडू, विविध परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी, कलाकार असे सर्वच जण नाराज आहेत. फोन करून आपल्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली, असे रोहित पवार म्हणाले आहेत.

Rohit Pawar : आगामी महापालिका निवडणुकीत विजयाची हंडी फोडण्यासाठीच गोविंदा आरक्षणाचा निर्णय, रोहित पवारांचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला
रोहित पवार
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : दहीहंडीतील (Dahihandi) गोविंदाना खेळाडू कोट्यातून 5 टक्के आरक्षण देण्याचा बुलेट ट्रेनच्या वेगाने घेतलेला निर्णय हा आगामी महापालिका निवडणुकीत विजयाची हंडी फोडण्यासाठीच घेतल्याची दाट शंका येते, असे मत राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी व्यक्त केले आहे. ट्विट करून त्यांना या निर्णयाबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी गोविंदांना आरक्षण देण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र या निर्णयावर टीका केली जात आहे. विरोधीपक्षच नाही, तर विविध स्पर्धा परीक्षा देणारे त्याचप्रमाणे इतर खेळप्रकारातील खेळाडूंनी नाराजी व्यक्त केली आहे. भावनेच्या भरात मुख्यमंत्री निर्णय घेत आहेत. हा पोरखेळ आहे, असा संतापही अनेकजण व्यक्त करत आहेत. अशाप्रकारचे निर्णय घेताना सर्वांनाच विश्वासात घ्यायला हवे, अशी भूमिका मांडली जात आहे.

‘युवकांच्या भविष्याशी निगडित विषयांबाबत राजकारण होऊ नये’

रोहित पवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्या गोविंदांना आरक्षण देण्याच्या निर्णयाचा समाचार घेतला आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाला विरोध नाही, मात्र कुठलाही निर्णय व्यापक विचारांतीच घ्यायला हवा. एवढ्याच सुपर फास्ट गतीने निर्णय घ्यायचे असतील तर खेळाडूंच्या नियुक्त्या, नोकरभरती यासंदर्भातील निर्णय घ्यावेत. पण युवकांच्या भविष्याशी निगडित विषयांबाबत राजकारण होऊ नये, अशी अपेक्षा रोहित पवारांनी व्यक्त केली आहे. स्पर्धा परीक्षा देणारे असंख्य विद्यार्थी आहेत. त्यांचे काय करणार, अनेक नियुक्त्या रखडल्या आहेत. भरती होत नाही, त्यावर काय उपाययोजना सरकार करणार आहे, अशा आशयाचे सवाल त्यांनी विचारले आहेत.

हे सुद्धा वाचा

‘विद्यार्थ्यांचे फोन आले, ते नाराज’

गोविंदांना आरक्षण जाहीर केल्याच्या निर्णयानंतर आता इतर खेळ खेळणारे खेळाडू, विविध परीक्षांचा अभ्यास करणारे विद्यार्थी, कलाकार असे सर्वच जण नाराज आहेत. फोन करून आपल्यावर अन्याय झाल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली, असे रोहित पवार म्हणाले आहेत. दरम्यान, अजित पवार यांनीही गोविंदांच्या आरक्षणाच्या निर्णयावर आपले मत व्यक्त केले होते. सर्वांना विश्वासात घ्यायला हवे. कोणतेही निर्णय भावनिक होऊन घेता येणार नाहीत, असे ते म्हणाले होते.