आमचा नाद करणारेच एकदिवस बाद होऊन जातील : रोहित पवार

| Updated on: Sep 29, 2019 | 8:12 AM

"आमचं कुटुंब एवढं मजबूत आहे की आमचा नाद करणारेच एकदिवस बाद होऊन जातील, असं रोहित पवार यांनी  फेसबुक पोस्टमध्ये (Rohit Pawar Facebook Post) म्हटलं आहे.

आमचा नाद करणारेच एकदिवस बाद होऊन जातील : रोहित पवार
Follow us on

मुंबई : “आमचं कुटुंब एवढं मजबूत आहे की आमचा नाद करणारेच एकदिवस बाद होऊन जातील, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू आणि राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार (Rohit Pawar Facebook Post) यांनी केली आहे. काही तासांपूर्वी केलेल्या फेसबूक पोस्टमध्ये रोहित पवार यांनी सत्ताधारी पक्षांवर (Rohit Pawar Facebook Post) निशाणा साधला आहे.

गेल्या दोन दिवसातील राष्ट्रवादीत घडलेल्या राजकीय घडामोडीमुळे संपूर्ण राज्याच राजकारण ढवळून निघालं आहे. याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे (Rohit Pawar Facebook Post) आपल्या भावना मांडल्या आहेत.

तुमच्या आमच्यापैकी जो कुणी व्यक्ती आपल्या कुटुंबावर मनापासून प्रेम करतो, त्याने आपल्या कुटुंबावर आलेल्या अडचणीच्या प्रसंगी जी प्रतिक्रिया दिली असती तितकीच प्रामाणिक प्रतिक्रिया म्हणजे आदरणीय अजित दादांनी आपल्या आमदारकीचा दिलेला राजीनामा, असं रोहित पवार फेसबुक पोस्टमध्ये (Rohit Pawar Facebook Post) म्हणाले.

“माझ्या आजोबांच्या म्हणजेच पवार साहेबांच्या ठिकाणी तुम्ही स्वतःच्या आजोबांना ठेवा आणि माझ्या अजित काकांच्या ठिकाणी तुम्ही आपल्या काकांना गृहीत धरा, सूडाच्या भावनेच्या राजकारणातून विरोधी पक्षांकडून साहेबांना आणि दादांना जो त्रास दिला जातो तेवढा त्रास जर तुमच्या आजोबांना किंवा काकांना दिला गेला असता तर तुम्ही काय केलं असत? लक्षात ठेवा जिथं प्रामाणिक प्रेम असतं तिथंच एवढ्या प्रामाणिक भावना असतात. अजित दादांच्या आजच्या भावनाच आमच्या कुटुंबातील एकमेकांवर असलेलं प्रेम दाखवून देतात.” असेही त्यांनी फेसबुक पोस्टमध्ये (Rohit Pawar Facebook Post) म्हटलं आहे.

“मी आपल्या सर्वांना एवढंच सांगेन की, पवार कुटुंबाला कितीही त्रास देण्याचा प्रयत्न होऊ दे. पण आमचं कुटुंब एवढं मजबूत आहे की आमचा नाद करणारेच एकदिवस बाद होऊन जातील. मी मागे पण सांगितलं आहे की अजिबात कशाची काळजी करू नका, आपला गडी लै खंबीर हाय. समाजाप्रती जे आपलं कर्तव्य आहे ते पवार कुटुंबीय आजपर्यंत पार पाडत आलंच आहे आणि यापुढेही हे काम सुरूच राहील. असंच एकत्र राहूया आणि पवार साहेबांचे हात बळकट करूया,” असं रोहित पवार यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदारकीचा तडकाफडकी राजीनामा दिल्यानंतर त्यांनी राजीनामा का दिला याबाबत अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. अजित पवार यांनी राजीनामा (Rohit Pawar Facebook Post) दिला आणि त्यानंतर जवळपास 20 तास ते गायब होते. मात्र काल (28 सप्टेंबर) दुपारी 1 च्या सुमारास अजित पवार शरद पवारांच्या निवासस्थानी दाखल झाले. त्याआधी खुद्द शरद पवार हे पुण्यावरुन मुंबईतील घरी सिल्व्हर ओकला पोहोचले. शरद पवारांच्या घरी पवार कुटुंबीयांची बैठक झाली. त्यानंतर अजित पवारांनी पत्रकार घेऊन आपलं म्हणणं मांडलं.