मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केलीय. “40 आमदारांचा हट्ट पुरवण्यात शिंदे (Eknath Shinde)-फडणवी (Devendrad Fadnavis) व्यस्त आहे. जनतेच्या मुलभूत प्रश्नांकडे मात्र दुर्लक्ष केलं जातंय. तरुणांना रोजगार नाहीये. महिलांचे प्रश्न प्रलंबित आहेत. त्याकडे मात्र सरकारचं दुर्लक्ष होतंय “, असं रोहित पवार (Rohit Pawar) म्हणालेत.
40 आमदारांचा हट्ट पुरवण्यात हे सरकार व्यस्त आहे. या सरकारला इतर प्रश्नांची काळजी नाही. राज्यपाल मात्र आपल्या विधानांनी सगळा गोंधळ घालतायेत, असं रोहित पवार म्हणावलेत.
कर्जत जामखेडच्या स्थानिक राजकारणावरही त्यांनी भाष्य केलंय. लोक राष्ट्रवादीच्या पाठिशी आहेत. विरोधकांना जे बोलायचंय ते बोलू द्या. पण 2024 ला बघू काय होतंय ते. लोकांचा कल कुणाला मिळतो ते, असं म्हणत रोहित पवारांनी राम शिंदेंवर निशाणा साधलाय.
दिशा सालियन प्रकरणाचा आज रिपोर्ट समोर आलाय. त्यावरही रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. आदित्य ठाकरेंवरचे आरोप फक्त राजकारणासाठी करण्यात आले आहेत.मुंबईची निवडणूक तेव्हा जवळ होती म्हणून आरोप करण्यात आला. मात्र आता निकाल बाहेर आला आहे.पण भाजप आता दुसरं काही प्रकरण बाहेर काढू शकतं. विरोधकांना बदनाम करण्यासाठी भाजप आरोप करत असतं, असं रोहित पवार म्हणाले आहेत.
आदित्य ठाकरेंच्या बिहार दौऱ्यावरही रोहित पवार बोललेत. तेजस्वी यादव चांगला नेता आहेत. त्यांचं काम चांगलं आहे. तरूण वयात त्यांनी जे काम केलंय ते कौतुकास पात्र आहे. त्यांमुळे आदित्य त्यांना भेटत असतील तर त्यात काही वावगं नाही, असं रोहित पवार म्हणालेत.