अहमदनगर : सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप (Rohit Pawar On Sushant Singh Rajput Case) राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. तसेच, विरोधकांच्या राजकारणामुळे मुंबई पोलिसांचं नाव खराब होत असल्याचंही रोहित पवार म्हणाले (Rohit Pawar On Sushant Singh Rajput Case).
सुशांत सिंह राजपूत प्रकरणावरुन आमदार रोहित पवार यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. त्याशिवाय त्यांनी पार्थ पवार यांच्या ट्विटवर देखील प्रतिक्रिया दिली आहे.
रोहित पवार काय म्हणाले?
“सुशांत सिह राजपूत प्रकरणावरुन विरोधक राजकारण कर आहेत. सध्या शिक्षण आणि आरोग्य हा विषय महत्त्वाचा असून यावर चर्चा होणे गरजेचे आहे. मात्र, विरोधक फक्त विरोध करायचा म्हणून विरोध करतात. तर काही महत्त्वाचे विषयांवर पोलीस मार्ग काढू शकतात, मूलभूत विषय बाजूला राहतात त्यामुळे इतर विषयांवर चर्चा करण्याची गरज आहे”, असं म्हणत रोहित पवारांनी विरोधकांवर निशाणा साधला.
विरोधकरायचा म्हणून करणं हे कितपत योग्य आहे, असा सवालही रोहित पवारांनी उपस्थित केला. तसेच, “सीबीआयकडे तपास गेला. मात्र, या राजकारणामुळे मुबई पोलिसांचं नाव खराब होतं आहे. माझी गोष्ट सोडा, हे कोणत्या व्यक्तीला आवडणार नाही”, असं मतही रोहित पवारांनी व्यक्त केला (Rohit Pawar On Sushant Singh Rajput Case).
पार्थ पवार यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया
पार्थ पवार यांच्या ट्विट विषयी रोहित पवारांनी आपलं मत व्यक्त केलं. “एखादी व्यक्ती जेव्हा ट्विट करते, ते त्यांचं व्यक्तिगत मत असतं. मात्र, मला पोलिसांवर विश्वास आहे”, अस रोहित पवार म्हणाले.
काम घोळत न ठेवता थेट निर्णय ही दादांची स्टाईल, अजित पवारांच्या भेटीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रियाhttps://t.co/LMIGFtduEF #NCP #SharadPawar #rohitpawar
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 18, 2020
Rohit Pawar On Sushant Singh Rajput Case
संबंधित बातम्या :
पार्थचा विषय कौटुंबिक, शरद पवार-पार्थ पवार वादावर रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया
बिहार पोलिसांची कार्यतत्परता पाहून तेथील गुन्हेगारी कमी होईल अशी अपेक्षा : रोहित पवार